प्रतिसाद - दिवाळी कट्टा

 

 दोन तीन लेख वाचले. रश्मी साठे यांनी मुद्रीत शोधन चांगले केले आहे. दर महिन्याच्या अंकात विषयांची विविधता आढळते. 
बंगळुरूसारख्या  बिगर मराठी भाषक राज्यात आपण दर महिन्याच्या एक तारखेला नियमितपणे व परिश्रमपूर्वक मराठी भाषेची सेवा करता हेच कौतुकास्पद आहे. आपल्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन

श्रीराम ढवळीकर
********************************************


तुमचा नवीन अंक मी वाचला.त्यातील लेखन दर्जेदार आणि वाचनिय आहे.तुमची निवड आणि संपादकीय छान आहे.
एखाद्या व्यावसायिक अंका इतकाच देखणा आणि उत्तम प्रतीचे लिखाण असलेला अंक तुम्ही सर्वांनी खूप मेहनतीने प्रकाशित केला आहे आणि तो नियमित करत आहात याचे एक महाराष्ट्रीयन म्हणून मला विशेष कौतुक वाटले.
तुम्हा सर्वांचे यासाठी मन:पूर्वक अभिनंदन !

माधुरी राव

No comments:

Post a Comment