आशीर्वाद, तुमचा लेख आताच वाचला. Amazing
and inspiring! जाणिवेच्या
असण्या आणि नसण्याच्या सीमारेषेवर स्वतःच्या अंतर्मनाशी झालेला अप्रतिम संवाद! Truly
a beautiful mind! अत्यंत सुंदर
भाषांतराबद्दल सुनीत राजहंस यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
दर महिन्याला अगदी कट्ट्याच्या अंकाची
आतुरतेने मी वाट बघत असते. कधी एकदा तो येतो आणि मी वाचून फडशा पाडते असे होते.
सगळे लेख न चुकता वाचते मात्र एक लेख वाचायला बरेच दिवस टाळाटाळ करत होते. लेखाचं
पेज ओपन करायचे पण पुन्हा नको म्हणून दुसऱ्या लेखा कडे वळायचे. वाचायचाही होता पण
कुठेतरी मनात शंका, भीती असं काहूर माजायचं. शेवटी धीर करून मी जानेवारीच्या अंकात श्री. आशीर्वाद आचरेकरांचा लेख
थोडासा चाळायला घेतला आणि बघता बघता आधीच्या सर्व अंकांमधले लेख काढून वाचून
काढले. अक्षरं अंधुकच दिसत होती. डोळ्यांमधील अश्रूंमुळे!!! आयुष्यात कधीही कोणाच्या वाट्याला येऊ
नयेत असे हे प्रसंग येतात कधीकधी, इलाज नसतो. पेशंट बरोबरच बाकीच्या नातेवाईकांचेही ते
खरे कसोटीचेच क्षण. आम्हीही साधारण अशीच केस एका अगदी जवळच्या
नातेवाईकांची अनुभवतोय. त्यामुळे पदोपदी येणाऱ्या आव्हानांची कल्पना आहे. पण अशा
अवघड प्रसंगीही सतत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांनी प्रसंगांना दिलेली टक्कर आणि
त्यातूनही नर्सवर न रागवता त्याला समजून घेऊन त्याच्याशी केलेली मैत्री ,एवढा संयम,धीर ,माणुसकी बघून डोळे भरून आले. हा प्रवास
त्यांनी लेखात खूप छान मांडला आहे. सर्वांसाठीच मार्गदर्शक असा हे लेख. त्यांना
निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
-
श्वेता मोघे साठ्ये
मस्त झालाय अंक. किनाऱ्यावरचा चंद्र खूप सुंदर! आणि
बाजरीच्या पुऱ्या खमंग... ह्रद्य आठवणी सांगत सांगत रेसिपीज देण्याची त्यांची
अनौपचारिक शैली खूप भावली.
नमस्कार!
सौ.रूपाली कडून कळताच मी कविता पाठवली आणि उशीर झाला असूनही आपण ती घेतलीत.. त्यासाठी
मनःपूर्वक धन्यवाद.
अंक सुरेख
झाला आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन.
- - स्मिता शेखर कोरडे
No comments:
Post a Comment