Nice articles. Read a few articles...will try the dish from Myanmar!
कट्टयाचे 'Jingles' हा पण एक उत्सुकतेचा भाग होतो आहे सीमा.
Chandu Ketkar
Washington D.C.
*******************************************************कट्टयाचे 'Jingles' हा पण एक उत्सुकतेचा भाग होतो आहे सीमा.
You are a trend setter of katta jingles.
*******************************************************
अपर्णा चेरेकर
******************************************************
आज कट्टा वाचला. सर्व लेख छान आहेत. शिराज खुप भावला. तिथल्या संस्कृतिची छान ओळख करुन दिलीस. मधले पान मस्त अगदी up to date
सर्व टीम चे अभिनंदन. पालकत्व एक सामुदेश दोन्ही छान लेख आहेत.
वैशाली नाडगीर
******************************************************
स्नेहा, सीमा ...
कट्टा नेहमीप्रमाणे उत्तम...सगळ्या कविता मस्त... विलायती खाऊ, शिराझ, पालकत्व, समूपदेशन उत्तम...दुसरं महायुद्ध कथा, मधले पान, भारतीचे फोटो छानच...
कट्टा म्हणजे सर्व क्षेत्रांतील गोष्टींचा समावेश असल्याने वाचन पूर्तीचा आनंद मिळतो...
धन्यवाद..
ज्योती कुलकर्णी
*******************************************************
*******************************************************
आज खूप वेळच वेळ
असल्या सारखं वाटलं खूप दिवसांनी.... मधल्या दिवसाची सुट्टी शनिवार रविवार हून
वेगळी असते.. शनिवार रविवार सुद्धा आपापल routine घेऊन येतात आणि वेळ कुठे कसा जातो कळत नाही आणि फुकटच
दमायला होतं.. त्या पेक्षा ऑफिस बर वाटत.. पण ही मधली सुट्टी दुपारी माझी एकटीची
कोणी distrub न करता आवडतं काही तरी करण्याची..
आज आताच
डिसेंबर चा कट्टा वाचला. सगळे लेख मस्त.. यावेळी कविताच कविता.. एक बाग, लाजवाब शुभदा पाठक.. छान लिहिली आहे. नाम संकीर्तन वाचलं आणि डोळे मिटून
ऐकलं.. राजास जी महाली ही कविता बहुदा सहावी ला आम्हाला होती.. आणि आमचा अक्ख्खा
वर्ग एका वेगळ्या चालीत ती कविता म्हणायचा.. ज्योती ची चाल अधिक गोड आहे.. आम्ही
मुलं नुसतं समूह गीता सारख पण रेकून म्हणायचो.. ते गीतं ऐकताना मी बालपणात
हरवले... मध्येच माझा नवराही ती कविता म्हणायला लागला show off करायला त्याला कशी सगळी कडवी आठवतात म्हणून.. मलाही ही कविता पाठ आहे पण
संत तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे हे विसरले होते .. ज्योतीचे खरं तर खूप आभार..
या संत मंडळींशी पुन्हा एकदा जोडून देण्या बद्दल.
शिराझ छान
लिहिलाय.. तो वाचताना माझ्या इंग्लंड मधल्या वास्तव्यात ओळख झालेलं एक देखण इराणी
जोडपं आठवलं आणि त्यांनी खिलवलेलं जेवण सुद्धा. प्रवास वर्णन खूप छान पण मला या
आधीचे काही भाग मला चुकले का अस वाटलं.
मधल पान is the best.. मला त्याला धावत पान
म्हणावसं वाटत. Unbiased reporting of important news.
दिनेश शिंदे
यांच्या creativity ला सलाम. (विलायती खाऊ )
पालकत्व, समुपदेशन नेहमी प्रमाणेच प्रगल्भ
तरीही सोप सुटसुटीत. Photo बघून Almaty la जायलाच हवं अस वाटलं.. खूप छान मासिक..
kudos to katta team for
such a wonderful work!
अलका देशपांडे
No comments:
Post a Comment