प्रतिसाद - सप्टेंबर कट्टा

मीना मासिकचे मुखपृष्ठ खूपच सुंदर 

नेहमीप्रमाणे तुझा संपादकीय लेख छान

आता मासिकाचे स्वरूप बदलणार आहे वाटत
पहिला गणपतीचा मोरेश्वरम् सिध्दीदम लेख मस्त
बाकीचे वाचते

हरवत चाललेले गंध हा तर आपल्याला रोजच येणारा अनुभव
अग मी वेंगुर्लेला गेले होते मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांचा  वास येत होता इतक्या वर्षात आपण विसरलो होतो की याचाही सुवास असतो
किती छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत चाललो आहोत

मधलं पान एकदम छान
आत्ताच्या सर्व घडामोडीचा आढावा 👍🏻
अंजली नाईक-पिंगे
*********************************************

राधा आणि मीरा कविता  छान आहे.
ज्योती छान माहीतीपूर्ण लेख. 🙏🙏 
ही माहीती मराठी लोकांसाठी नवीन आहे. तुझे खूप खूप आभार. कारण कन्नड वाचतां येत नाही. नी मराठी भाषा नी मराठी भाषिक महान हा आपला असलेला गैरसमज.
बैलपोळा कविता एकदम झकास. मला खूप आवडली. 
शब्देविण संवादू लेख फारच सुंदर. रविंद्र केसकरांच्या रूपात एक दिग्गज लेखक कट्टयाला मिळाला ह्यात शंका नाही. त्याबद्दल कट्टा टीमचे अभिनंदन 💐💐

आरती जोशीचा मोरेश्वरम सिद्धीधम् लेख पण मस्त
नी औचित्यपूर्ण . छान मांडणी झाली आहे. ओघवती नी सोपी भाषा.

गंध ह्या विषयावर एक मोठा छान लेख तयार झाला आहे
स्मिता बर्वेंचं खूप खूप कौतुक. असं फारच क्वचित 
सुचू शकेल
 
आपल्या सीमा बाई home page वर कविता देण्यात pioneer. सीमा तुझं त्याबद्दल विशेष कौतुक !! पवन जोशींची कविता खूपच छान . ते खरोखरीचे कविच आहेत. त्यामुळे चांगल्या चांगल्या कविता तिथेच वाचायला मिळतील ह्यात शंका नाही.
रुपा भदे
**********************************************

कट्टा अंक छान 👌👌काही लेख आत्ता वाचले.
 हरवत चाललेले गंध वाचून लहानपणीच्या शिकेकाई ची आठवण झाली . शब्दविना संवादू पण छान. स्नेहा  मधले पान अगदी अप टू डेट , गीताई इ व नामसंकीर्तन पण डिटेल व अर्थपूर्ण 
कट्टा टीमचे अभिनंदन.👍🏻👍🏻
वैशाली नाडगीर
*************************************************

नेहमीप्रमाणे कट्टा सर्वांग सुंदर. ज्योती, अलका तुमचे लेख अभ्यासपूर्ण. महिन्याचा आढावा मधल्या पानात चांगल्या रीतीने घेतला आहे. काही लेखमालांची उणिव पुढच्या महिन्यापासून जाणवेल.
मनोरमा जोशी
*************************************************


काल रात्री कट्टा वाचला छान झालाय.
शब्देविण संवादु आणि मधले पान दोन्ही विशेष छान झाले आहे.
गंधाली सेवक
*************************************************

व्वा! कट्टाचा अंक फारच छान आहे. खूप वेगवेगळ्या कल्पना, विचारांची फार छान गुंफण केली आहे👍👍👍 अभिनंदन👏👏👏
सीमा प्रधान

No comments:

Post a Comment