या आकाशाचे डोळे येता भरून
नकळत माझ्या डोळा येते पाणी
त्याची माझी आहे वेगळी प्रेम कहाणी
त्याच्या साठी आसुसलेली मी एक विरहिणी
तो माझा प्रियकर मी त्याची प्रियतमा…!!!
त्याच्या थेंबांच्या वर्षावात मी चिंब होते
हिरवे हिरवे आनंदाचे गाणे होऊन जाते
त्याच्या भेटीचा आवेग वाढतच जातो
विजांच्या कडकडाटात,ढगांच्या गडगडाटात
तो अखंड बरसत राहतो…!!!
धुवांधार पाऊस मस्त धुंद हवा
सगळीकडे पसरलेला हिरवा गारवा
मनात मोहरलेला हिरवा मरवा
श्यामल सखा झेपावे मजकडे
तांबड्या कुशीत फुलवण्या हसू
रुजून येती पुन्हा नव्याने
हिरवे हिरवे पाचू…!!!
वैजयंती डांगे
No comments:
Post a Comment