प्रिये…

  


गोड नाजुक वळणावर 

आता आयुष्य वळू दे

प्रिये तुझ्याच साथीने 

हा वनवास टळू दे…


माझ्या अंगणात मी

चंद्र पिंजून ठेवीला

तुझ्या येण्याचा सांगावा

त्यास सांगून ठेवीला

आता तुझीया केसात

मला चांदण्या माळू दे…


मी आईच्या साथीने

झेलले अनेक आघात

नको सोडूस राणी

आता हातातला हात

माझ्या ताईला माहेरी

गोड मैत्रिण मिळू दे…


वाट चाललो आजवरी

मी मित्रांच्या जोडीने

परी येईन परतूनी

फक्त तुझ्याच ओढीने

गाडी माझ्या आयुष्याची

आता संसारी रूळु दे…


तुझ्याविना हा युगांचा

मी दुरावा साहतो

माझ्या घराचा उंबरा

वाट तुझीच पाहतो

ओलांड प्रेमाचे माप

अर्थ सुखाचा कळू दे…


प्रिये तुझ्याच साथीने

हा वनवास टळू दे…


     प्रेरणा चौक





·    

 


No comments:

Post a Comment