प्रिय हॅरी आणि मेगन


चुकून तुम्हाला प्रिन्स नी प्रिन्सेस म्हणणार होते. पण आता नाही म्हणणार बाबा. तुला नी मेगनला नको असेल तर कशाला उगाच?
तुझं रॅायल सीनिअर म्हणून स्टेपबॅक केल्यावरचं पहिलं-वहिलं भाषण पाहीलं. जरा भावुक वाटलास. पुरूषांचं असच होतं रे.
मी आणि माझा नवरा ठाण्याहून बंगलोरला आलोत्याला हवंतर आपण ‘ठेक्झिट’ म्हणू. तर नवराच भावुक झाला होता. बरंआम्ही त्या गावचे कुलकर्णी किंवा पोलीसपाटील असू तर तसं ही नाही. मी मात्र मेगन सारखी उत्साहाने ठेक्झिट घेतली. नको चिंता करूसहोईल सर्व ठीकठाक. आम्हीही आलोच की नेसत्या वस्त्रानिशी परप्रांतात! आता सगळं काही आहे. गाडीघर,नोकर चाकर!

तुमच्या पदव्याड्यूक ऑफ ससेक्स नी डचेस ऑफ ससेक्स! एवढे चांगले चांगले शब्द इंग्रजीत असताना काय रे हा अनाचार!! शेवटचा शब्द उच्चारताना मेल्याहून मेल्यासारखं होतं बघ!! एक्झिट घेतलीस ते बरच केलंस म्हणायचं. 

दोन्ही फॅमिलीत किती ते साम्यतुम्ही कॅनडात तर आम्ही कन्नड प्रांतात!! कॅनडावालेतुमच्या सिक्युरीटीपोटी जास्तीचा टॅक्स भरणार नाहीत असं ऐकलं. नका भरू म्हणावं. आता जेव्हा तुम्हीच भरपूर टॅक्स भराल नातेव्हा त्या कॅनड्यांची तोंडं गप्प होतील. आमचं सांगतेआम्ही टॅक्स भरत होतोभरत आहोत नी भरत राहू.

मेगनबाई गंआमच्याकडे पण काळा-गोरा भेद आहेच. वर आणि कोकणस्थ-देशस्थ भेद पण आहे. कोकणस्थांकडे बोडण असतं. जाऊ देतुला कळायचं नाही ते. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून घर सोडत नाही गं आम्ही. मराठीत त्याला निगरगट्ट म्हणतात!! कोणती गोष्ट किती मनावर घ्यायची ते आपल्यावरच अवलंबून असतं. उमळे गोरे असण्यापेक्षा आम्ही ठसठशीत काळे बरे’, हे वाक्य माझ्या नेहमी उपयोगी पडलं नी पडतं.

उंबरठ्यावरचं माप ओलांडून यायच्या आधीपासून तुझ्यात नी तुझ्या मोठ्या जावेत केट मधे तुलना होते आहे. केटनी केलं तर ते चांगलंनी तेच मेगननी केलं तर ते मात्र वाईट. गोरी नी हजार गुण चोरी दुसरं कायब्रिटिश नी अमेरिकन हा भेद ही जाणवणारच गं त्या मिडिया वाल्यांना. फार फार strong आहेत म्हणे ते. आमच्याकडे मिडिया म्हणजे काळेकोट घातलेल्यांच्या वरताण!! न्यायाधीश!! अमेरीकेत तुम्ही color म्हणतां इथे ते colour म्हणतात. पण तुझा कलर मला आवडतो. मी पण तशीच आहे वुमन विथ कलर !! सेम टू सेम

तुला ना सासूचा जाचना सासऱ्यांचा काच. पण त्या पापराझींनी अगदी नको नको केलं.  

माझं मात्र उलटं आहे. कुठे कॅमेरा-बिमेरा दिसलानी शूटींग-बिटींग चाललेलं दिसलंकी मी त्यात तोंड घातलंच म्हणून समज. थोडे पापराझी इकडेही पाठव ना. पब्लिक फंडाचा वापर न करता स्वतंत्र व्हायचा निर्णय मात्र ए वन !! आता बाकीच्या रॉयल्सवर त्याचा काय परिणाम होतोते पहायचं. सुक्याबरोबर ओलंही जळत नाही ना हाच प्रश्न आहे.



बरंते राहू दे. लग्नाकार्याला येत रहा. गेलीस नी तिकडचीच झालीस असं मात्र करू नकोस. पापराझींच्या पापी नजरेपासून आर्चीला सांभाळ. त्याला आशिर्वाद व गोड पापा.


तुझी कॉमनवेल्थ हितचिंतक
रूपा भदे बंगलोर


रूपा भदे

No comments:

Post a Comment