"तू जरा सिरीयसली विचार करायला हवा. Time is running out." - मी कालचा, डिनर-टेबलवरचा विषय पुन्हा सुरु केला.
"आता इथेही तू मला लेक्चर देणारेस? तसं असेल तर मी एकटीच पुढे जाते."
ती.
खूप दिवसांनी आम्ही दोघं एकत्र सायकलिंगला निघालो होतो. तीन-चार वीकेंड्सपासून ती मागे लागली होती. शेवटी आज सकाळी ती सायकल घेऊन एकटीच निघाली तेव्हा तिने मला जो जळजळीत लुक दिला, तो पाहून मी पेपर बाजूला टाकून लगेच मागोमाग माझी सायकल घेऊन निघालो होतो. सकाळचं कोवळं ऊन, मोकळा रस्ता, सायकलिंगसाठी परफेक्ट दिवस!
"लेक्चर? मला खूप काळजी वाटते तुझ्या एकंदर ॲटिट्युडबद्दल,
म्हणून सांगतोय."
ती जरा स्लो होऊन माझ्याशेजारून पेडलिंग करायला आली.
"what's wrong with my attitude?"
"तू पाहतेस ना, आजूबाजूला गोष्टी किती झपाट्याने बदलतायत? लोक आपल्या प्रोफेशनमधे,
विरंगुळ्यामधेही सतत काहीतरी नवीन ट्राय करतायत. You know people are constantly experimenting with themselves. स्वतःचा शोध घेतायत. काही तरी मोठं, महत्वाकांक्षी करू पाहतायत.
तू स्वतःबद्दल जरा जास्तच कम्फर्टेबल आहेस. ह्यात अल्पसंतुष्टीपणाचा भास होतो."
मी खूपच बोललो हे कळलं मला, पण ती शांत होती आणि चेहऱ्यावर हलकंसं हास्य ठेवून सायकलिंग
करत होती. आज वारा तिच्या केसांत जास्तच रेंगाळत होता.
"मला सांग. स्वतःला शोधायचं म्हणजे काहीतरी नवीनच केलं पाहिजे का?" ती.
"नाही."
"मग, काहीतरी मोठंच करायला हवं, असं आहे का?"
"नाही."
"पुढे जाऊन स्वतःचा शोध जे घेतात त्यांनी बहुधा स्वतःला कुठेतरी मागे सोडलेलं
असतं. आणि जर एखादी लहानशी गोष्ट, आपल्यातल्या त्या मागे राहिलेल्याशी
जोडत असेल, तर मग उगाच का भरकटल्यासारखं शोध घेत पुढे जायचं?"
"मग कर की तू तसं. शोध ती लहानशी गोष्ट."
"तेच तर करतेय ना आता?" असं हसत म्हणून ती पेडल मारत पुढे निघाली. तिच्या
सायकलिंगमधे आज मी एक ग्रेस, एक लय नोटीस केली. तिला तिची लय सापडली होती!
चित्र: गुगल इमेजेस |
मानस
No comments:
Post a Comment