source: Google
प्रेम अक्षरांवर
करा, प्रेम शब्दांवर करा,
प्रेम पुस्तकांवर
करा ……।
पुस्तके असतात जीवलग
मित्र,
त्यांचेशी संवाद
करा, वाद करा
प्रेम पुस्तकांवर
करा ……।
तुमच्या हृदयाचे
ठोके, पुस्तक ऐकू शके
पुस्तक उराशी घट्ट
धरा
प्रेम पुस्तकांवर
करा ……।
पुस्तक डोळ्यात साठवा
पुस्तक मनात आठवा,
त्याच्या अंतरंगात शिरा
प्रेम पुस्तकांवर
करा ……।
पुस्तकाचा वास घ्या,
त्याला सहवास द्या
सांभाळा त्याचा नखरा
प्रेम पुस्तकांवर
करा ……।
संगणकावरही वाचू
शकाल पण स्पर्श सुखाला मुकाल
स्क्रीनवर अक्षरे
सरकतील, पुन्हा उमटतील,
पण मोरपिसाच्या आठवणीचं
काय?
जाळीदार पिंपळपानाचं काय?
केसाची बट, पदराची
वट, नजरेचा इशारा
हे सारं विसरणार
काय? … म्हणून म्हणतो ……|
संगणक हाताशी असुदे,
पण पुस्तक उराशी घट्ट धरा
पुस्तकांवर प्रेम
नितांत करा
डॉ. मधुकर त्र्यम्बक घारपुरे
No comments:
Post a Comment