राधा कृष्ण प्रेम सुधाकरी (अभंग )

Water color painting by Meenal Tongaonkar

जळी स्थळी दिसे l
तीज एकमात्र l
कृष्णच सर्वत्र l
राधेश्याम ll

ध्यानी मनी तोचि l
देवकी नंदन l
करिता मंथन l
हरीनाम ll

अविरत करी l
हरिचे चिंतन l
बोलती कंकण l
कृष्ण कृष्ण ll

सोड ना क्रुरा l
कोसती गोपिका l
विनवी राधिका l
क्षणोक्षणी ll

नको जाऊ कृष्णा l
कैसे कंठु दिन l
जीव होतो क्षीण l
तुजवीण ll

मुरलीचे वेड l
लावीतो मुरारी l
भाळिते बावरी l
राधाभोळी ll

नाद मुरलीचा l
हरपतो भान l
राधिकेचे ध्यान I
सदाकाळ ll

राधा रमणचे l
प्रेमच आगळे l
जगी या वेगळे l
सर्वाहून ll

मूर्ती मंत प्रेम l
भक्तीचे प्रतिक l
प्रेम हे सात्विक l
राधेकृष्ण ll

रमण राधेचा l
आत्मा एकरुप l
प्रगटला दीप l

अव्दैताचा ll १०


वैशाली वर्तक


No comments:

Post a Comment