कट्टा दिवाळी विशेषांक २०२०

 


श्वेता साठ्ये 

संपादकीय

ह्या वेळचा खास दिवाळी अंक आपल्या हातात ठेवताना खूपच समाधान वाटत आहे. परिस्थिती कशीही असली तरी सण आला की आपल्या चित्तवृत्ती फुलून येतातच. याचेच प्रत्यंतर आम्हांला तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादातून आले आहे. आहुर्ली ह्या गावापासून बार्शी, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगांव, पुणे ही शहरे एवढेच नव्हे तर अहमदाबाद, बंगलोर, ह्या महानगरांतूनही सगळ्यांनी भरभरून दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवले आहे. सर्वच साहित्याला ह्या दिवाळी कट्टात सामावून घेणे कठीण होते. काही चांगले लेख-कविता पुढच्या महिन्यातील कट्टातही देण्याचा मानस आहे.

दिवाळीच्या फराळांत जशी विविधता असते, तशीच विविधता लेखांतूनही आपल्याला दिसेल अशी आशा आहे. 'फराळाची गंमत' - ह्या विषयावरील लेख जरुर वाचा. फराळ करण्याचे, शिकण्याचे वेगवेगळे मार्ग आता उपलब्ध आहेत. पण तरीही होणाऱ्या गंमतीजमती, झालेला गोंधळ वाचून मजा वाटते. ह्या दिवाळीचा फराळ करतानाही याची तुम्हांला आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

दिवाळी साजरी करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, त्याची रंजक माहिती लेखांतून मिळेल. 'आनंद अश्रू' ह्या कथेतील अहिराणी भाषेचा गोडवा तसेच 'माझ्या घरची दिवाळी' ह्या लेखातील दख्खनी भाषेचा लहेजा जरूर अनुभवा.

आपल्या सणात दिव्याला, दीपज्योतीला खूप महत्व असते. ह्या विषयावर अनेक कविता आल्या आहेत. तसेच 'भाऊबीज' हा खास भावाबहिणीचा सण. हरवलेली निरागसता, हरवलेले बालपण अशा सणांतून पुन्हा एकदा अनुभवता येते. फोटो फिचरमध्ये तर जणू रंगांची उधळण आहे. विविध प्रकारच्या मनमोहक रांगोळ्या यात आहेत.

याशिवाय आपल्या नेहमीच्या लेखमालाही वाचायला विसरू नका. हा दिवाळी अंक आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा. कोरोनाच्या थोड्याशा चिंतीत, अनिश्चित वातावरणात हा दिवाळी अंक आपल्या ओठांवर हसु आणेल, आपल्या डोळ्यांत आशेचे दीप उजळेल अशी आशा आहे.

कट्टा वाचकांना येणारी दिवाळी अमाप आनंदाची, असीम सुखाची जावो ही आम्हां सर्वातर्फे शुभेच्छा!!!!!!!!


आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 


No comments:

Post a Comment