साहित्य
:-
इडली
रवा : १ वाटी
साधा
रवा : पाव वाटी
चिरलेला
गूळ : १ वाटी
(आवडीनुसार प्रमाण कमी-जास्त करावे)
तूप : अर्धी वाटी
ओलं
खोवलेलं खोबरं : अर्धी वाटी
दही
: २ चमचे
दूध गरजेनुसार
वेलदोडा
पूड : १ चमचा
काजू-बदाम काप, बेदाणे : पाव वाटी
पाणी:
गरजेनुसार
मीठ
: १ चमचा
सोडा
: १ चमचा( ऐच्छिक)
कृती
: -
कढईत दोन ते तीन चमचे तूप घेऊन इडली रवा व रवा एकत्रच मंद आचेवर थोडा भाजून
घ्या. एकीकडे गूळ थोडे दूध आणि पाणी घालून त्यात खोवलेले खोबरे घालून ठेवून द्या.
गूळ
छान विरघळला की त्यात भाजलेला रवा घालून सर्व एकत्र करून ठेवून द्या. मिश्रण इडली
पिठासारखे सरसरीत असावे.
दहा
पंधरा मिनिटांनी त्यात दही घालून एकत्र करून परत थोडा वेळ मुरू द्या.
साधारण
एक तासाने त्यात सुकमेव्याचे काप, बेदाणे, वेलदोडा पूड, मीठ व हवा असल्यास किंचित सोडा घालून परत एकदा छान हलवून इडली
पात्राला तूप लावून पळीने मिश्रण घालून इडली सारखे
वाफवून घ्या. किंवा कुकरच्या डब्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण घालून
वाफवून वड्या पाडा. साधारण वीस मिनिटात सांदण तयार होतात.
गरम
गरम सांदण वर तुपाची धार सोडून मस्तपैकी ताव मारा.
*सांदण सोबत लोणच्याची फोड , पोह्याचे पापड, नारळाचे दूध किंवा साधे दूधही छान लागते.
©सौ. श्वेता अनुप साठये
No comments:
Post a Comment