चैत्र महिना...
नवनिर्मितीचा, वसंताचा सळसळता उत्साह सगळीकडे भरून राहिलेला... नवी पालवी, नवा उल्हास,
नवे संकल्प पूर्ण करण्याचा नवा जोश... या साऱ्याचं प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभी रहाते
"गुढी". तसं गुढ्या, तोरणं उभारून हा आनंदोत्सव का साजरा केला जातो याबद्दल
अनेक कथा सांगितल्या जातात. आपल्याला त्या माहित आहेतच. माझ्या स्नेही सौ. सरोज घोरपडकर
आणि स्मिता तळाशीकर या दोघींनी मिळून जे नव्या अर्थाचे आयाम दिले आहेत ते मला विशेष
वाटतात.

या गीताच्या
मुखड्यामध्येच इतकं उत्सवी वातावरण तयार होतं की काय सांगू !!! गुढीची रचना, तिचा अर्थ
अतिशय सुंदर मांडला आहे. गुढी ही नववर्षाची, चैतन्याची प्रतीक आहेच पण तिचे महत्व अनेक
तऱ्हेने समजावून सांगतांना आजच्या काळाला आवश्यक अशा संकल्पाच्या, मांगल्याच्या आणि
विश्वशांतीच्या गुढीचीही मांडणी केली आहे. मला खात्री आहे की हे गीत गुढी पाडव्याला
प्रत्येक घरात वाजेल आणि सर्वांना विश्वशांतीचा संदेश पोहोचवेल.
या कार्यक्रमाचं
DD Chandana वाहिनीवरून ७ एप्रिल २०१३ ला थेट प्रक्षेपणही करण्यात आलं होतं. त्याची
लिंक खाली देत आहे तसंच फक्त ऑडिओ लिंकही देत आहे.
जरूर ऐका...
युगादि ऑडिओ,
स्वर- ओंकार संगोराम, श्रुती संगोराम आणि प्रवरा संदीप
प्रवरा संदीप
No comments:
Post a Comment