सीसीडीच्या
बाहेर टॅक्सी थांबली. ती घाईघाईत पैसे देऊन उतरली. तिला उशीर झाला होता. बाहेरूनच तिची
आत बसलेल्या त्याच्यावर नजर पडली. "पन्नाशी उलटूनही किती रुबाबदार दिसतो हा. जरा
रुसलेला दिसतोय पण. मे बी, मला उशीर झाला म्हणून असेल. बट आय एम शुअर, मला बघताक्षणी
ह्याचा राग गुल होईल." स्वतःशीच हसून ती आत शिरली.
"सॉरी,
मुंबईच्या ट्रॅफिकला काही अर्थच उरला नाहीये. " तिने त्याला एक घट्ट मिठी मारली.
"दॅट्स
ओके डार्लिंग! तू कशी आहेस?"
"मस्त! तूच सांग, कशी दिसते?" तिने खुर्चीत बसता बसता
विचारलं.
"वेल,
दिसण्यावरनं आपण आतून कसे आहोत हे ठरलं असतं, तर हे actors लोक सगळ्यात सुखी असते,
नाही का? आणि तू मला इथे बोलवलंयस म्हणजे नक्की काहीतरी..."
"ओके,
सांगते. It's about Viraj."
"म्हणजे?
मला वाटलं You are getting your space with Viraj. म्हणूनच तर तू घरातून निघून त्याच्याबरोबर
रहायला लागलीस, राईट? घरी तुझी घुसमट होत होती.
मग आता?"
"हो
रे. तिथे आई खूपच interfere करायची. मी येईपर्यंत वाट पाहणं. जेवायला थांबणं. माझ्या
मित्रांची चौकशी करणं... मला स्पेस हवी होती.
Viraj is amazing. तो मला कुठलेही
प्रश्न विचारत नाही. कुठे जातेयस, कधी येणारेस, वगैरे. मीसुद्धा त्याला तेवढीच स्पेस, फ्रीडम देते. आमची
एकत्र आणि स्वतःची वेगवेगळी अशी विश्वं आहेत."
"मग?
प्रॉब्लेम कुठे आहे?"
"विराज
खूप पॅशनेट आहे सगळ्याच बाबतीत. त्याची हीच क्वालिटी मला खूप आवडायची, आवडते. पण त्यामुळे त्याच्याबरोबर एखादं डिस्कशन,
एखादा प्लॅन करायला गेलं, की त्यात तो खूप डॉमिनेट करतो. त्याची मतं खूप ठाम असतात.
आणि तो समोरच्याची बाजू शिताफीने किंवा हट्टाने खोडून काढतो."
"तू
त्याला हे सांगितलं आहेस?"
"नाही,
म्हणजे इंडायरेक्टली प्रयत्न केला सांगायचा. पण त्याचा तो स्वभावच आहे. मी त्याचं हे
वागणं त्याच्या मित्रांबरोबरही असतं असं नोटीस केलंय. आजकाल मी त्याच्याशी कुठलाही
वाद घालत नाही आणि त्यालाच सगळं प्लॅनिंग करू देते. पण आता एक वेगळीच घुसमट होतेय."
"ओके,
म्हणजे तुला खऱ्या अर्थाने, आता स्पेसची गरज
आहे. तुझ्या विचारांना, मतांना स्पेस हवीये.
एकमेकांच्या वेगळ्या, वैयक्तिक विश्वात ढवळाढवळ न करणं म्हणजे एकमेकांना स्वातंत्र्य
देणं होत नाही. तुमच्या एकत्र विश्वात तुम्ही किती adjust करता आणि दुसऱ्या व्यक्तीला
किती जागा देता हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तू त्याला पूर्ण स्पेस दिली yes, but
sorry to say, you have lost your space."
"म्हणूनच
मी ठरवलंय की तिथून निघायचं."
"एक
सांगू? हा निर्णय घेण्याआधी एकदा त्याच्याशी
स्पष्ट बोल. त्याला कदाचित ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. पण जर त्याचं खरंच तुझ्यावर
प्रेम असेल तर तो ही गोष्ट समजून घेईल आणि पुढे असं होणार नही याची काळजी घेईल. Try
it out. कुठल्याही रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलणं
खूप गरजेचं असतं. मी त्या चुकीची शिक्षा अजून भोगतोय." शेवटचं वाक्य तो जरा हळू
आवाजात बोलला. पण तिने ते ऐकलं.
"येस,
बोलते त्याच्याशी. त्याला एक चान्स द्यायला
हरकत नाही."
दोघांनी ऑर्डर
केलेली कॉफी त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारत संपवली. तास कसा गेला दोघांनाही
कळलं नाही.
"बरं
मग, मी येऊ? एका क्लायंटबरोबर डिनर मीटिंग
आहे अर्ध्या तासात." त्याने घड्याळाकडे बघत म्हटलं.
"ओके."
"बाय,
टेक केअर आणि मला कळव पुढे काय होतं ते. यू नो इट, पण तरी सांगतो, आय एम ऑल्वेज़ देअर
फॉर यू." एवढं म्हणून तो निघाला.
बाहेर पडतो
तोच त्याच्या फोनचा मेसेज टोन वाजला. तिचाच
मेसेज होता. "थँक्स बाबा, फक्त तुझ्याशी
मी आज हे बोलू शकले आणि त्याचं कारणही मला
आज कळलं - लहानपणापासून तू माझ्या विचारांना व्यक्त करायला दिलेली स्पेस. थँक्स फॉर
बिईंग सच एन अमेझिंग फादर."
source : Google |
तो वळला,
ती त्याच्याकडेच पाहत होती. त्याने तिच्या दिशेने एक फ्लाईंग किस दिला आणि "बाय
प्रिन्सेस" म्हणून टॅक्सीत बसला दोघांचेही डोळे पाणावलेले होते. अशी मैत्री दुर्मिळच असते.
मानस
No comments:
Post a Comment