तिचा जन्म अगदी खेडेगावात आणि दवाखान्याच्या दारात बैलगाडीतच झाला. ती जणु आई-अण्णा आणि आम्हा भावंडांसाठीच जन्माला आली होती. एक जबाबदार मुलगी! माझ्या आणि तिच्यात आठ वर्षांचे अंतर. तिची समजही खूप छान होती. त्यावेळी घरची कौटुंबिक स्थिती, आर्थिक ओढाताण, पै पाहुण्यांचा राबता यामुळे मुलामुलींना परिस्थितीचे भान लवकर आणि उपजत असायचे. लहान वयातच, आहे त्या परिस्थितीवर मात करुन आपण आणि आपली भावंडं यांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे
याचे भान तेव्हा
आपोआप असे.
source: Google |
तिच्यात अनेक कला होत्या. ती गाणं घेऊन एम. ए झाली
होती. तिला चित्रकलेत
ही गती होती. फार सुंदर चित्रे
काढायची ती. शिवण, विणकाम, खाद्यपदार्थ यात ती पारंगत होती. रांगोळी अतिशय सुंदर काढायची. कलात्मता आणि रसिकता यांचा सुंदर संगम होता
तिच्यात. तिची नवनवीन शिकायची हौस, गुणग्राहकता यत्किंचितही
कमी झालेली नव्हती. आज अशी असंख्य घरे आहेत. त्यात अशी स्त्रीशक्ति जन्मलेली आहे. त्यांचे कर्तृत्व पडद्यामागेच राहिलेले असले तरी पण आज त्यांच्यामुळेच किमान दोन घरे, त्यातील लहान भावंडे स्वत:च्या पायावर उभी आहेत. सुखाने जगत
आहेत हे विसरुन चालणार नाही.
अशी ही आमची ताई म्हणजे ‘सौ. स्मिता उदय गाडगीळ’. आयुष्यात कधीही, अगदी जन्मतानासुद्धा दवाखाना न बघणारी अशी
ताई, शेवटी एका अल्पशा आजारामुळे आम्हाला लवकर सोडून गेली. शेवटपर्यंत आमची काळजी, मुलांची व्यवस्था यावरच बोलणारी. दुखणे अगदी हसतमुखाने सहन करित, कुणालाही त्रास न देता, कोणाकडुनही जास्त सेवा न घेता, ७ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला आम्हाला सोडून गेली. तिला मानाचा, आदराचा, कृतज्ञतेचा साष्टांग नमस्कार…
- भक्ति विवेक सिन्नरकर
No comments:
Post a Comment