नव्या वर्षी कट्टा
समितीने आपल्या वाचकांसाठी काही खास नव्या लेखमाला सुरु केल्या आहेत. ह्या
लेखमालेतून मनोरंजनाबरोबर काही नवी माहिती आपल्या वाचकांना मिळावी असे आम्हाला
वाटते.
विलायती खाऊ -
ही लेखमाला
सादर करत आहेत दिनेश शिंदे. ते जवळजवळ २० वर्षे भारताच्या बाहेर रहात आहे. अगदी लहानपणापासून ते शाकाहारी आहेत. अंडेसुद्धा खात नाहीत.
हौस आणि आरोग्यपूर्ण आहाराची आवड यातून ते कायम स्वत: जेवण करून,जेवत आले आहेत. त्यातून जे काही पदार्थ घडत गेले,त्यातले काही या लेखमालेत दिले आहेत.
ह्या लेखमालेबद्दल वाचा त्यांच्याच शब्दांत, सुकुमा विकी ह्या पहिल्या भागात.
हौस आणि आरोग्यपूर्ण आहाराची आवड यातून ते कायम स्वत: जेवण करून,जेवत आले आहेत. त्यातून जे काही पदार्थ घडत गेले,त्यातले काही या लेखमालेत दिले आहेत.
ह्या लेखमालेबद्दल वाचा त्यांच्याच शब्दांत, सुकुमा विकी ह्या पहिल्या भागात.
समुपदेशन - काळाची गरज -
ही लेखमाला मात्र एक खास हेतू मनात धरून सुरु केली आहे. आजच्या जगात, संपर्काची
अनेक साधने असूनही, अनेक माणसांना आपले दुखः बोलून दाखवायला जागा उरलेली नाही. मग
मनातच कुढणे, तणावपूर्ण जगणे अशा गोष्टी सहजच दिसतात. ह्याचा मनावरच नव्हे तर
शरीरावरही परिणाम होत असतो. पण अशावेळी अजूनही मानसोपचार तज्ञाकडे जाणे अनेक जण
टाळतात.
ह्या लेखमालेतून मानसोपचारांची प्राथमिक ओळख सगळ्यांना व्हावी हा उद्देश
आहे. वाचकांनी ही लेखमाला आवर्जून वाचावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. डॉ.पूर्वा
रानडे ही माहिती आपल्यासाठी देत आहेत.
किस्से आणि कहाण्या
दुसऱ्या महायुद्धाच्या -
दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या
निमित्ताने आम्ही ही लेखमाला देत आहोत . ह्या युद्धाने जगाचा नकाशा बदलला. युद्ध
लढण्याचे जुने संकेत बदलले. जगाला आमुलाग्र बदलवणाऱ्या ह्या युद्धाचा ७५ वर्षांनी
पुन्हा वेध घेण्याचा हा प्रयत्न. डॉ. दिलीप कानडे यांनी ही लेखमाला खास
कट्टा वाचकांसाठी लिहिली आहे.
पालकत्व -
ही मालिका मात्र
ह्यावर्षी ही चालू राहणार आहे. मुलांना वाढवणे हे किती नाजूक काम आहे, आणि ते किती
जबाबदारीने करावे लागते हेच यातून दिसते. अनेक वाचकांना ह्या सदरातील लेख आवडत
आहेत, पटत आहेत हेच ह्या लेखमालेचे यश आहे.
No comments:
Post a Comment