काजळी होऊन,
डोळ्यात सजणारी
जळली जरी
यातना,
अश्रूंना
तेजाळणारी...
ऊर्जास्रोत
जणू,
श्वासऋतूंना
जगणारी,
आभाळी गाभाऱ्यात,
मंद मंद तेवणारी...
सुगंधाची
लयलूट,
आनंदाची पर्वणी,
जन्म मृत्यूच्या
कुशीत,
अर्थगर्भ
रुजणारी...
वहिवाट चालताना,
जाणिवांना
शोधणारी,
त्याची भेट
होताच,
वास्तवाला
विसरणारी...
भावभावनांना
बिलगून,
आयुष्याला
बांधणारी,
ओढ लागता
पुन्हा,
कृष्ण कृष्ण
जपणारी...
आरुशी
दाते
No comments:
Post a Comment