तिचा सिनेमा - Yesterday

 


दक्षिण आफ्रिकेतील झुलुंच्या प्रदेशातील एक विस्तिर्ण, निष्पर्ण माळरान. पिवळ्या करड्या मातीचा रस्ता. दूरवरुन येणाऱ्या दोन व्यक्तिरेखा कॅमेऱ्याच्या दिशेने चालत येताना दिसतात. अतिशय संथ गतीने चित्रपटाची सुरवात होते. त्यातील मध्यमवयीन यस्टरडे व तिची लहान मुलगी ब्युटी ह्या दोघी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे चाललेल्या आहेत. 

ब्युटीला हा न संपणारा लांचा रस्ता बघुन आपण पक्षी का नाही असे वाटते. इतके लां चालण्यापेक्षा मी पक्षाप्रमाणे उडत गेले असते. यस्टरडे उत्तरते नाही, कारण तू, 'तू' आहेस. आरोग्य केंद्रात आधीच खूप गर्दी असल्याने डॉक्टरांची भेट होत नाही. हिरमुसली होउन यस्टरडे व ब्युटी लांलचक रस्ता तुडवत घराकडे परततात. आरोग्यकेंद्राच्या अशा असंख्य वाऱ्याणि ती खडतर पाउलवाट आपल्याला यस्टरडेच्या जीवनातील कष्टाची जाणीव करुन देते.

यस्टरडेचा नवरा जॉन जोहान्सबर्ग जवळच्या कुठल्याश्या खाणीमध्ये खाणकामगार म्हणुन काम करीत असतो. यस्टरडे आणि ब्युटी खेडेगावातील आपल्या लहानश्या घरात समाधानी जीवन जगत असतात. तिची तिथे थोडीशी शेतीही आहे. चित्रपटातील दक्षिण आफ्रिकेतील हे गाव बघताना महाराष्ट्रातील कोणत्याही एका लहानश्या खेड्याची आठवण व्हावी असेच ते आहे. तिथेही हातपम्पावर पाणी भरण्याच्या निमित्ताने जमलेल्या बायका मनसोक्त हास्यविनोद करत गप्पा मारीत असतात. ह्या गावातील सर्वच पुरुष कामाच्या शोधात शहरांकडे गेलेले आहेत. त्यामुळे गावात फक्त स्त्रिया आणि लहान मुलेच आहेत.

आरोग्य केंद्रात जेव्हा यस्टरडेच्या आजाराचे निदान होते तेव्हा तिच्यावर दु:खाचा कडाच कोसळतो. केंद्रातील गोऱ्या डॉक्टर एड्सबद्दल तिला माहिती सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. या आघाताने खेळकर, आनंदी यस्टरडे कोमेजुन जाते. गावातील बायकाही तिला टाळु लागतात. एकीकडे प्रकृती ढासळत असताना जॉनच्या शोधात ती जोहान्सबर्गला येते. इथे तिला जॉन भेटतोच, पण तिला झालेला एड्स आपल्यामुळेच झालेला आहे हे लक्षात येउनही तिला निर्दयपणे मारझोड करतो. चहुबाजुंनी आलेल्या संकटानी यस्टरडे पार भेदरुन, गांगरुन जाते.

पण तिचा खरा खलनायक असतो एड्स. स्वत:हा एड्सग्रस्त जॉन जेव्हा आपल्या घरी परततो, तेव्हा तो मरणाच्या दारात उभा असतो. त्याच्या प्रमाणेच यस्टरडेलाही आपला मृत्यु साक्षात जिवंतपणे दिसु लागतो. एवढ्या विपरीत परिस्थितीत  ही एकच आशेचा किरण तिला ब्युटीच्या रुपाने दिसत असतो. स्वत: कधीही शाळेत न गेलेली यस्टरडे ब्युटीला शाळेत घालण्याचे स्वप्न बाळगून असते. आपल्या अंधारलेल्या भविष्यात सुद्धा तिला ब्युटीचे शिक्षण दिसत असते.

माळरानावरुन चालत आरोग्यकेंद्राकडे जाणाऱ्या माय-लेकींच्या संवादाने सुरु झालेला हा चित्रपट, यस्टरडे तिला त्याच माळरानावरील शाळेत सोडुन घरी परतते तिथे पूर्ण होतो.

चाळीस वर्षांपुर्वी एडसच्या रुपाने हा यमदूपृथ्वीवर आला आणि त्याने असंख्य संसार उध्वस्त केले. डॅरेन रूट दिग्दर्शित आणि भारतीय वंशाचे निर्माते अनंतसिंग यांनी  झुलु भाषेत केलेला हा पहिला चित्रपट. यात यस्टरडेच्या दुर्दम्य आशावादाची गोष्ट अतिशय साधेपणाने व नेटकेपणाने सांगितली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भावनांना  हातही घालत नाही तसेच तो एड्सवरचा माहितीपटही होत नाही. हा चित्रपट होतो एका महिलेच्या, आईच्या दुर्दम्य आशावादाचा आरसा........ इतका की प्रेक्षकांची पावले ही यस्टरडेचा आशावाद घेनच चित्रपटगृहाबाहेर पडतात.

Directed by

Darrell Roodt

Written by

Darrell Roodt

Produced by

Anant Singh
Helena Spring

Starring

Leleti Khumalo
Harriet Lenabe

Distributed by

HBO Films (USA)

Release date

·         3 September 2004

Running time

96 minutes

Country

South Africa

Language

Zulu

 

 

वैखरी फडणीस




No comments:

Post a Comment