तुझा नी माझा संसार फक्त पोकळ केव्हा झाला,
शिशिराचे चांदणे पडते, तेव्हा तुला असते call ची घाई,
आणि ऐन पहाटेच्या वेळी माझे मात्र रूटीन सुरु होई.
पैसापरी पैसा आपण फक्त कमवत जातो,
प्रेम असते भरपूर आणि ओढही तितकीच राही
Monday to Friday 'बिझी' मन 'लाँग विकेंड'ची वाट पाही
चल घेऊया थोडा ब्रेक, त्याच त्याच रुटीनमधून,
शोधू नव्याने हरवून गेलेले आपले ते क्षण,
दुःखाचे काटे बाजूला सारत वेचूया फक्त सुखाचे ते कण.
डॉ.तेजू
No comments:
Post a Comment