नाही कळले कधी, जीव जडला कसा
तुझ्या प्रीतीचा
मी घेतला वसा
तू माझी आस,तू माझा श्वास
देशील मला साथ हा
माझा विश्वास
कधी भासे हरवते
आहे वाट अंधारात
तुझ्यासवे चालताना
होते ती चांदरात
अबोल तू, मन मुक्त मी
निश्चयी तू, चंचल मी
आयुष्याच्या या
वळणावर
नात्यांची ही
सुरेख गुंफण
सरले 'मीतू पण' झालो
"आपण"
हात तुझा असता
हाती
संकटाची नाही
भीती
वेलीवरची कलिका
सांगे
आपुल्या दोघांची
प्रीती
अशीच राहो आपुली
जन्मजन्मांतरीची नाती.
स्वाती पाठक
No comments:
Post a Comment