आपला सख्खा शेजारी, म्यानमार. लोकमान्य टिळकांना इथल्याच मंडाले मधल्या कारागृहात ठेवले होते. जुन्या जमान्यातील नर्तिका, हेलन पण याच देशातली. अनेक वर्षे हा देश यादवी युद्धामधे भरडला गेला आणि अगदी अलिकडे तो पर्यटकांना खुला झाला आहे. त्या देशातील अगदी साधासा आहार म्हणजे हिन हतोते. आपल्याकडच्या कुठल्याही पदार्थापेक्षा याची चव वेगळी असते, पण घटक मात्र आपल्या परिचयाचे आहेत.
लागणारे साहित्य असे -
२ वाट्य़ा तांदळाचा रवा (इडली रवा चालेल),
१ कांदा पातीची जुडी,
२/३ लाल टोमॅटो,
१०/१२ लसूण पाकळ्या, १ टेबलस्पून तीळ, आवडीनुसार लाल मिरच्या, तेल, मीठ.
२ वाट्य़ा तांदळाचा रवा (इडली रवा चालेल),
१ कांदा पातीची जुडी,
२/३ लाल टोमॅटो,
१०/१२ लसूण पाकळ्या, १ टेबलस्पून तीळ, आवडीनुसार लाल मिरच्या, तेल, मीठ.
हिन हतोते करण्यासाठी
टोमॅटो कापून एका भांड्यात घ्या आणि मंद आचेवर थोडे गरम करा. सुटलेला रस थोडा आटू
द्या. (टोमॅटो पुरेसे आंबट नसतील तर थोडी टोमॅटो पेस्ट किंवा केचप घाला.) मग भांडे
खाली उतरून त्यात रवा घाला. मग त्यात कांदा पात बारीक चिरून घाला. (थोडी
सजावटीसाठी बाजूला ठेवा).
मग त्यात रव्याच्या दुप्पट पाणी घालून १०/१५ मिनिटे बाजूला ठेवा. आता हे मिश्रण ईडली पात्रात किंवा वाट्यांमधे भरुन, इडलीप्रमाणेच १५/२० मिनिटे वाफवून घ्या. (मूळ पदार्थ, केळीच्या पानात वाफवून करतात.)
मग त्यात रव्याच्या दुप्पट पाणी घालून १०/१५ मिनिटे बाजूला ठेवा. आता हे मिश्रण ईडली पात्रात किंवा वाट्यांमधे भरुन, इडलीप्रमाणेच १५/२० मिनिटे वाफवून घ्या. (मूळ पदार्थ, केळीच्या पानात वाफवून करतात.)
हे वाफवून होईपर्यंत, लसूणाच्या
पातळ कापा करुन घ्या. तेल तापवून त्यात या कापा सोनेरी रंगावर तळून बाहेर काढा. मग
त्याच तेलात तीळ घालून ते तडतडले कि गॅस बंद करा. तेल थोडे थंड झाले कि त्यात लाल
मिरचीचे तुकडे (किंवा लाल तिखट) घाला. आता वाफवलेला रवा बाहेर काढा. किंचीत
कुस्करा आणि त्यावर लसणीचे तुकडे आणि तीळ मिरचीचे तेल घालून खा. बाजुला ठेवलेली
कांदा पात वरुन घ्या.
यात हवे तर थोडे आले देखील घालता येईल. वाफवलेले मिश्रण फुगत नाही. मूळ पदार्थात तांदळाचे पिठ वापरलेले असते पण रवा वापरल्याने हा पदार्थ आपल्याला नक्कीच आवडण्याजोगा होतो.
(मूळ पदार्थ सामिष आहे.) मिरचीचे आणि तेलाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल.

दिनेश शिंदे
No comments:
Post a Comment