सुदान हा उत्तर पश्चिम आफ़्रिकेतला एक देश. अलिकडेच यादवी युद्धात या देशाची दोन शकलं झाली आहेत. मी जरी हा पदार्थ माझ्या सुदानी मित्राकडून शिकलो असलो तरी उत्तर आफ्रिकेतील अनेक देशांत हा पदार्थ थोड्याफार फरकाने केला जातो. मी इथे देतोय हे त्याचे आपल्या चवीला रुचेल असे रुप.
ईमाम बायील्दीचा शब्दश: अर्थ, ईमाम बेशुद्ध पडला. हा प्रकार खराच इतका रुचकर होतो, की कोणी ईमाम अत्यानंदाने बेशुद्ध पडला असेल, यावर विश्वास बसतो. याला लागणारे घटक, आपल्या परिचयाचे आहेत, पण कृती किंचीत वेळखाऊ आहे.
साहित्य :
अर्था किलो भरताची काळी वांगी (विकत घेताना, चमकदार रंगाची व आकाराच्या मानाने वजनाला कमी असतील अशी घ्यावीत. जी वांगी जड असतात, त्यात भरपूर बिया असतात.), २ कांदे, २ टोमॅटो, एक टी स्पून हळद, १ टी स्पून लाल तिखट, मूठभर कोथिंबीर, ६/७ हिरव्या मिरच्या, अर्धा कप व्हिनिगर, तेल, मीठ व साखर.

कृती :
वांग्याची साले सोलाण्याने काढून त्याच्या एक सेमी जाडीच्या चकत्या करून घ्या. खोलगट पॅनमधे थोडे तेल घालून, या चकत्या सुट्या सुट्या ठेवा. आधी या चकत्या सर्व तेल शोषून घेतील, त्यामूळे जास्त तेल घालावे लागेल. या चकत्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळायच्या आहेत. (मूळ कृतीत त्या भर तेलात तळतात. पण शॅलो फ्राय केले तरी चालते.) सगळ्या चकत्या एका वेळी तळणे शक्य नसते म्हणून दोन तीन बॅचेस मधे तळाव्या लागतील.

या तळायला थोडा वेळ लागतो. त्या दरम्यान कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्या. सर्व चकत्या तळून झाल्या की पॅनच्या कडेला रचून ठेवा. त्या आता तेल सोडू लागतील. हे तेल पॅनच्या मध्यभागी जमा होईल. त्या तेलात कांदा घाला. तो परतून मऊ करत रहा. त्याच वेळी वांग्याच्या चकत्या उलथन्याने दाबून त्यातले तेल बाहेर काढत रहा. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद आणि तिखट घाला. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. कांदा व टोमॅटो नीट मिसळून घ्या. त्याच वेळी वांग्याच्या चकत्या, पॅनमधेच चमच्याने ठेचून त्यांचा लगदा करा.
हा लगदा कांद्यात मिसळत रहा. असे करत करत सर्व चकत्यांचा लगदा करा. सगळे मिश्रण एकत्र झाले कि त्यात व्हिनिगर, मीठ व साखर घाला. हे मिश्रण नीट शिजवून एकजीव करा. आता यातले बरेचसे तेल वर येईल. तसे झाले कि आच बंद करा. हा प्रकार पूर्ण थंड झाला कि त्यात बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घाला.
( या पदार्थाची कृती नीट समजावी म्हणून मी सविस्तर लिहिली आहे, पण नक्कीच क्लीष्ट नाही.) हा पदार्थ फ्रिजमधे आठवडाभर सहज टिकतो. खरं तर दुसऱ्या दिवसापासूनच जास्त चवदार लागतो. हा पदार्थ परत गरम करायचा नाही. चपाती, नान (पिटा ब्रेड) सोबत छान लागतो.

दिनेश शिंदे
No comments:
Post a Comment