विनंती विशेष


साधारणपणे आंतरराष्ट्रीय
  महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतल्या सुप्रसिध्द महिलांची माहिती देण्यात येते. पण आम्हांला वाटते, आपल्या आयुष्यातही अनेक महिला असतात, ज्या आपल्याला मदत करत असतात, ज्यांच्यामुळे आपण अधिक आत्मविश्वासाने पुढे पाउल टाकू शकतो. मग ती आपली आई असेल, सासू असेल, सहचारिणीबहिण, मैत्रीण, वा सहकारी असेल, किंवा शेजारीण देखील असेल. कधी त्यांच्याकडून मदतीचा हात पुढे येतो, कधी एखादा मोलाचा सल्ला मिळतो तर कधी फक्त त्यांचे आपल्यासोबत असणे धीर देते.
त्या मदतीने, सल्ल्याने आपले आयुष्य बदलते. कधी आपल्या प्रयत्नांना दिशा मिळते तर कधी मनाला उभारी मिळते. आहे अशी एखादी आठवण तुमच्याकडे? मग लिहून पाठवाच. कारण मोठ्या कर्तृत्वामागे नेहमीच अशा छोट्या गोष्टी असतात. या महिला दिनाच्या निमित्ताने अशा काही आठवणींना उजाळा देऊया.

आमचा ईमेल idmitramandalkatta@gmail.com

- मित्रमंडळ बंगळुरू कट्टा टीम 

No comments:

Post a Comment