व्हायरल

 

'अरे! हे बघ काय.. आपला नाक्यावरचा चाटवाला 'व्हायरल’ झाला.' चहाच्या वेळी फोन बघताना शेखर म्हणाला.

 

'व्हायरल झाला? अरे त्याचं चाट खाऊन लोकांना व्हायरलचा ताप येतो. तो काय व्हायरल होणार?' मी.

 

'फालतू विनोद! अरे आजकाल कोणीही व्हायरल होतंय. तू जरा बरं लिहायला लागलास तर तू ही होशील.' शेखरचा टोमणा

 

'अबे, शेखर चिल्ली, वीकेन्डला लोणावळ्याऐवजी थेट पुण्याला जाऊन आलायस वाटतं', माझा परतफेडीचा टोमणा. माझ्या लिखाणावर कोणी टोमणे मारले की मी भावुक होतो हो.

 

'अरे, तुझं सोड. बघ ना हा फोटो. ये अपना र्मा है, कॉर्नरका. एका जोडप्याच्या मध्ये उभा आहे, आपले केशरी दात काढत. आणि खाली लिहिलंय की ह्यांचं लग्न त्याच्यामुळे झालंय.'

 

'काय? दाखव दाखव. असं कसं काय केलं त्याने?' माझा अजिबात विश्वास बसत नव्हता.

 

'नो आयडिया! संध्याकाळी विचारू जाता जाता.'

 

'तेव्हा गर्दी असते रे. एक काम करू या. दुपारी साडेचारच्या सुमारास तो जेव्हा ठेला लावत असतो तेव्हा जाऊ आणि विचारू.' मी फार काळ उत्सुकता दाबून ठेवू शकत नाही. बरोब्बर साडेचारला आम्ही दोघं त्याच्या ठेल्यावर गेलो. साहेब व्हायरलच्या प्रसिद्धीमुळे खुलले होते. आम्हाला बघून शर्मा जुने मित्र भेटल्यासारखा खूष झाला.

 

'मुझे लगा तुम पैचानेगा नही अभी फेमस होने के बाद.' शेखरने हसत शर्माला टोमणा मारला, 'भूल मत, हम तुम्हारे एकदम पैले, मतलब जुने-पुराने कस्टमर है.'

 

'जुने-पुराने नाही रे. नुसते पुराने म्हण.', लोक मराठी मिश्रीत हिंदी का बोलतात? परवा आमचे सासरेबुवा असेच फोनवर कोणाला तरी 'हमको तुम्हारे कार्ड के स्कीममें 'काडीमात्र' इंटरेस्ट नहीं है. क्यों बार बार दोपर में फोन करता है?' असं दरडावून सांगत होते. असो. मुद्यावर येऊ या. शर्मा लगेच, 'नहीं साहब ऐसे कैसे भूलेंगे आपको. आज कैसे बहुत दिनों बाद याद आयी हमारी? कुछ चटपटा बना दूं फटाफट? सब रेडी है.'

 

'नहीं रे. वो सब बादमें. पहले ये बता, ये क्या नया निकाला है. जोडी बनाने का. चाट खिलाते खिलाते लोगों की कुंडली मिला रहा है क्या?' मी.

 

'नहीं साब. बताता हूं. इधर सामने के ऑफीससे एक मॅडम अपने फ्रेंड ग्रुप के साथ चाट खाने आती थी. उन मॅडम का चाट अलग से बनाना पडता था. बहुत नखरा रहता था उनका. ग्लव्ह पहनो, प्याज़ कम और पतला रखो, सिंग चना मत डालो, मीठा इतना, तीखा उतना, नमकीन इतना, पूछो मत. नाक में दम. ऐसा लगता था, भेल नहीं कोई दवाई बना रहा हूं. और हां. ये इमली का चटनी साइड में लेके चाटना. अजीब आदतें.

अब ये कम था की कुछ दिनों बाद एक और ग्रुप में एक लडका आने लगा. वैसे तो ठीकठाक था. लेकीन कभी कभी उन मॅडम जैसा ही सेम टू सेम नखरा करता था. मानो जैसे अचानक दिमाग घुम गया हो. अब मॅडम लोग का नखरा समझ में आता है. लेकिन कौन लडका इतना नखरा करता है?

एक दिन मैने वो मॅडम को बोला की एक लडका कभी कभी शाम को छे के आसपास आता है जो बिल्कुल आप जैसाही चाट बनवाता है. वो मॅडम कुछ परेशान हुई, कुछ बोली नहीं, लेकिन दूसरे दिन उसी टाईम पे आयी जब ये सर्किट साहब आये हुए थे. और पता नहीं क्या हुआ, वो मॅडम उसको देख के रोने ही लगीं. फिर वो दोनों चले गए. बस, बाद में पता नहीं उन दोनों में क्या हुआ.  एक दिन सीधा शादी का कार्ड लिये आ गये. और मुझे थँक्यू करने लगे. तभी कुछ लोगोने ये फोटो ले ली और मोबाईलपर भगाई. बस. लेकिन राम कसम तब से धंदा और बढा है.'

 

शेखरने माझ्याकडे बघून हसत मान हलवली. दोन शेवपुरी पार्सल घेऊन आम्ही ऑफीसकडे परत निघालो.

 

'फुस्स. काही हवाच नाहीये ह्या स्टोरीत. ह्या सगळ्यात शर्माचं काय क्रेडिट? मला वाटलं चमचमीत लव स्टोरी मिळेल ऐकायला.' शेखरचा अपेक्षाभंग झाला होता.

 

'त्याने जे नाही सांगितलं ते मी सांगतो. ते दोघं बहुधा एकत्र होते कधीतरी. आणि वेगळं होऊनही तो तिच्या आठवणीत तिच्या ह्या सवयीचं अनुकरण करायचा. एखादी व्यक्ती आपल्या आत कधी कधी इतकी भिनते की ती सोडून गेल्यावर ही तिच्या आठवणी जपत आपण कधी कधी असा वेडेपणा करतो. तिच्याशी निगडीत असलेल्या काही गोष्टी, प्रसंग अनुभवायचा प्रयत्न करतो.'

 

'समजलो गुरु. आज माझा मानसशास्त्राचा फ्री क्लास आहे. ही शेवपुरी गुरूदक्षिणा म्हणून स्वीकार करावी.', शेखर हात जोडून चिडवत म्हणाला. विषय तिथेच संपला.

 

संध्याकाळी घरी आल्यावर आज खूप दिवसांनी कपाटात आत ठेवलेल्या सेंटेड कॅन्डल्स काढल्या, जगजीत सिंगच्या गझल्सची सीडी शोधून लावली, आणि एक मस्त ड्रिंक स्वतःसाठीच बनवून एकटाच शांत खिडकीत बसून राहिलो.

त्या कँडल्स, तो जगजीत आणि ते ड्रिंक, ह्यातलं काहीही माझं फेवरेट नाहीये... तरी आज त्याचं आणि गुलज़ारांचं, 'शाम से आँखमें नमी सी है, आज फिर आपकी कमीसी है..' नेहमीपेक्षा जास्तच आतवर लागत होतं.

लाईफ कॉम्प्लिकेटेड आहे. पण म्हणूनच तर त्यात मजा आहे. नाही का?


मानस


No comments:

Post a Comment