मित्रमंडळाच्या गणरायाची
प्रतिष्ठापना २ सप्टेंबरला मोठ्या भक्तिभावाने झाली. कलेचा आणि बुद्धीचा उपासक
असलेल्या गजाननासमोर आमच्या बालकलाकारांनी आपली प्रतिभा सादर केली.
सिंथेसाइजरवर निमिष बोडस, स्वरा बागुल व गिटारवर राजस आणि प्रणव अभ्यंकर यांनी आपली उत्कृष्ट कला दाखवली.
 |
निमिष बोडस |
 |
स्वरा बागुल |
 |
राजस व प्रणव अभ्यंकर |
 |
पर्णिका कदम |
पर्णिका कदम हिने
भरतनाट्यम या नृत्यशैलीद्वारे गणरायाला मानवंदना दिली.
 |
आदित्य जोशी |
आदित्य जोशी याच्या riddles ने तर प्रेक्षकवर्गात धमाल
आणली.
 |
श्रद्धा कमते, राजस डहाळे, निमिष बोडस |
संगीताच्या तालावर निमिष बोडस, राजस डहाळे आणि श्रद्धा
कमते यांनी १५ मिनिटांत गणपतीचे सुंदर असे live acrylic painting बनविले.
या छोट्या पण गुणी
बालकलाकारांचे खूप खूप अभिनंदन व त्यांना भरभरून शुभाशीर्वाद.
मुलांच्या विविध गुणदर्शनाची झलक पहायाला
इथे क्लिक करा: YouTube Link
स्वप्ना सोमण
No comments:
Post a Comment