जाळं ........

 


धागा धागा विणूनि कोळी बांधतो जाळे

परत परत बांधतो कितीदा तरी झटकले.

अडकता सावज झेप घेउनी

स्वतःच्या जाळ्यात स्वतःच फसे

कोळ्याचे जाळे, सौंदर्याचा आविष्कार

उन्हात चमकताना दिसते सुंदर फार

 

माणसाच्या मनातली जाळी म्हणजे

नको त्या विचारांचा नुसता भडीमार

अनेक नकारांच्या अपमानांची जाळी

मनात नको तरी घर करून बसली

माझ्या ही नकळत मलाच छळू लागली

भावभावनांच्या विणलेल्या जाळ्यात

माझी मीच फसले.

 

स्वतः भोवती कळत नकळत विणलेल्या

असंख्य कोषांची जाळी होण्या आधीच

बाहेर पडण्यासाठी खूप धडपडले.

 

मनातील जाळी झटकून टाकली काही

नवीन विचारांची जाळी कधी विणली

माझे मलाच कळले नाही.

बाहेर पडण्याची धडपड मात्र व्यर्थ ठरली

 


वैजयंती डांगे




No comments:

Post a Comment