दुसरे महायुद्ध थोडक्यात...


दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात जर्मनांनी पोलंडवर सप्टेंबर १९३९ रोजी केलेल्या आक्रमणानी झाली. ब्रिनच्या पंतप्रधानांनी जर्मनीला तंबी दिली की जर त्यांनी सप्टेंबरला सकाळी अकरा वाजेपर्यंत आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा नाही केली तर पोलंडशी असलेल्या कराराप्रमाणे ब्रिटनला युद्ध घोषित करावे लागेल.

जगाला ब्लिट्झक्रीग ह्या नव्या जर्मन युद्धतंत्राची चुणूक लगेच दिसली पोलंड एका महिन्यात शरण आले. रशियाने पूर्वेकडून आक्रमण करून पोलंडचे लचके तोडले.

ब्रि फ्रान्सला पोलंडच्या मदतीसाठी काहीही करता आले नाही कारण त्यांच्या आणि त्या देशाच्या मध्ये संपूर्ण जर्मनी होता. त्या वेळेस फ्रान्सने त्यांच्या सीमेवर फक्त जर्मन डिव्हिजन असताना काहीही हालचाल केल्यामुळे हे शक्य झाले.



त्यानंतर रशियाने फिनलॅन्डवर आक्रमण केले. येथेसुद्धा युद्धात सामील नसलेल्या स्वीडनमधून सैन्य घुसवणे शक्य नसल्यामुळे पुन्हा दोस्तराष्ट्रांना काहीही करता आले नाही. चर्चिलच्या सांगण्यावरून ब्रिटनने नॉर्वेच्या सागरी सीमेत पाणसुरूंग पेरले आणि हिटलरला डेन्मार्क आणि नॉर्वेवर आक्रमण करावयास आयते कारण मिळाले.

अशा परिस्थितीत चेंबर्लेनने राजीनामा दिला,चर्चिलच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरकार स्थापन झाले आणि फ्रान्सच्या मदतीला ब्रिटिश सैन्य युरोपमध्ये पाठवले गेले.

आता हिटलरने आपले लक्ष फ्रान्सकडे वळविले. हॉलंड,बेल्जीयम लक्झेमबर्ग पादाक्रांत करून फ्रान्सच्या संरक्षक मॅजिनो लाईनला उत्तरेकडून वळसा घातला. अशा प्रकारे ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्य डंकर्कच्या किनाऱ्यावर अडकले,पण आपल्या सागरी कौशल्याच्या करामतींनी इंग्रजांनी अडीच लाख सैन्य आपल्या देशी परत नेले.

फ्रान्सची लढण्याची इच्छाशक्ती पूर्णपणे कोलमडली त्यांनी १० जून १९४०ला संपूर्ण शरणागती पत्करली. आता जर्मनीच्या शत्रूंजवळ युरोपमध्ये पाय ठेवायला एक इंचपण जागा उरली नव्हती.

हिटलरला माहीत होते की त्याला इंग्लंडचा पाडाव करावा लागेल किंवा हे युद्ध हरावे लागेल. म्हणून त्याने इंग्लंडवर तुफान बॉम्बफेक सुरू केली. त्याच्या विजयाच्या मध्ये फक्त काही शेकडा फायटर पायलट उभे होते. त्या तरुणांचे कौतुक करताना चर्चिलने हे अजरामर वाक्य नोंदवले ‘never in the histroy of human conflict was so much owed by so many to so few’

या वेळेस हिटलरच्या मित्रांनी,इटलीच्या मुसोलिनीने आफ्रिकेत थिओपियावर हल्ला केला. त्याला गाळातून काढण्यासाठी हिटलरला आपल्या सगळ्यात शूर सेनापतीला,रोमेलला पाठवावे लागले. रोमेलने लिबिया ट्युनिसिया जिंकून कैरोपर्यंत बाजी मारली.

ता हिटलरनी आपली पहिली घोडचूक केली,इंग्लंडला पूर्णपणे नमविता २२ जून १९४१ला रशियावर आक्रमण केले. काही महिन्यातच जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीपर्यंत पोहोचले. तेथे मात्र नेपोलिअनप्रमाणे हिटलरलाही रशियाच्या प्रचंड थंडीने पराभूत केले.

डिसेंबर १९४१ला जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरस्थित नौदल केंद्रावर हल्ला करून अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले आणि हिटलरने दुसरी घोडचूक केली. त्याने स्वतःहून अमेरिकेशी युद्ध घोषित केले. आता जर्मनी विरुद्ध अमेरिकेची मुबलक साधनसामग्री आणि रशियाचे प्रचंड मनुष्यबळ उभे ठाकले.

रशियामधला पेचप्रसंग १९४३ पर्यंत कायम राहिला. लेनिनग्राड शहराची वर्षें नाकेबंदी होत राहीली. भयंकर उपासमारीने लाख लोक मृत्युमुखी पडले. सर्वांत निर्णायक लढाई स्टलिनग्राड येथे झाली ज्यात जर्मनीचा एक फील्ड मार्शल,व्हॉन पौलूससुद्धा युद्धबंदी झाला. त्यानंतर जर्मनीची पीछेहाट सुरू झाली.

आफ्रिकेमध्ये पश्चिमेकडून अमेरिकन आणि पूर्वेकडून ब्रिटिश सैन्यांनी रोमेलची कोंडी करून एल एलॅमिन येथे त्याला पराभूत केले. मग ट्युनिशियातून सिसिलीवर उडी मारून दक्षिणेकडून दोस्त राष्ट्रांनी इटली पादाक्रांत करणे सुरू केले.

पश्चिमेकडे दुसरी आघाडी उघडण्यासाठी दोस्तराष्ट्रांनी इंग्लंडमध्ये प्रचंड फौजफाटा गोळा केला जून १९४४ ला आतापर्यंतचे सगळ्यात मोठे समुद्री आक्रमण उत्तर फ्रान्सच्या नॉर्मडी भागात केले२५ ऑगस्ट १९४४ला पॅरिसला  मुक्त केले आणि दोस्तराष्ट्रानी जर्मनीकडे मुसंडी मारलीयेथे हिटलरने तिसरी घोडचूक केलीआपले सैन्य देशाच्या वेशीवर लावण्याऐवजीं संपूर्ण युरोपभर विखरून ठेवले.





त्यानंतर रशियाने पूर्वेकडून आणि इंग्लंड-अमेरिकेने पश्चिमेकडून जर्मनीला पेचात पकडले युद्ध जर्मनीच्या सीमेत पोहोचले. दोन्ही सैन्ये एल्ब नदीकाठी एक झाली जर्मनीचे उत्तर-दक्षिण तुकडे झाले









हिटलरने १मे १९४५ला आत्महत्या केली ८मे १९४५ला युरोपमधील तोफा थंडावल्या.

इकडे आशियामध्ये जपानने आग्नेय आशियातील के देश पादाक्रांत करत थेट भारतापर्यंत मुसंडी मारली. ह्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेचा सहभाग सर्वविदित आहेच. इथेपण १९४४ नंतर जपानची पीछेहाट सुरू झाली आणि हिरोशिमा नागासाकी वरील अणुबॉम्बहल्यानंतर त्या देशाने संपूर्ण शरणागती पत्करली.

अशा प्रकारे प्टेंबर १९४५ला दुसरे महायुद्ध थांबले,पण शांती प्रस्थापित व्हायला जगाला आणखीन ४४ वर्षे महिने आणि दिवस वाट पाहावी लागली.

तो दिवस आला १९८९मध्ये, नोव्हेंबरला. बर्लिन भिंत ढासळली आणि आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली.     
      


                                         डॉ. दिलीप कानडे



No comments:

Post a Comment