वर्ष १९४२ च्या मार्चमध्ये, ब्रिगेडीयर ऑर्ज विंगेट यांनी २ महिने ब्रह्मदेशाचा दौरा करून, त्वरेने भारताकडे चालून येणा-या जपानी सैन्याच्या पिछाडीस राहून त्यांच्या हालचालींवर गनिमी काव्याने, काही करता येईल का याबद्दल पाहणी केली व आपला अहवाल सर सेनापती जनरल आर्चिबाल्ड व्हेवेल यांना प्रस्तुत केला. त्यावर सविस्तर चर्चा होउन, अशा प्रकारचे सैन्य उभारण्यास मान्यता देण्यात आली. ह्या सैन्यास, चिंडीट हे नाव, बौद्ध मंदिरांचे रक्षण करणा-या पौराणिक पशू वरून देण्यात आले.
प्रशिक्षण :
पहिल्या तुकड्यांसाठी भारतीय पायदळाच्या ७७ डिव्हीजन, ब्रिटीश सैन्याच्या किंग्स लिव्हरपूल रेजीमेंट व ब्रह्मदेशातील जंगल युद्ध प्रशिक्षण शाळेतील सैनिकांना निवडण्यात आले. त्यानंतर, गोरखा रायफल्सच्या तिस-या व दुस-या आणि बर्मा रायफल्सच्या पिछेहाट झालेल्या दुस-या बटालियन मधून पण सैनिक घेण्यात आले.
पहिल्या तुकड्यांसाठी भारतीय पायदळाच्या ७७ डिव्हीजन, ब्रिटीश सैन्याच्या किंग्स लिव्हरपूल रेजीमेंट व ब्रह्मदेशातील जंगल युद्ध प्रशिक्षण शाळेतील सैनिकांना निवडण्यात आले. त्यानंतर, गोरखा रायफल्सच्या तिस-या व दुस-या आणि बर्मा रायफल्सच्या पिछेहाट झालेल्या दुस-या बटालियन मधून पण सैनिक घेण्यात आले.
वरील सैनिकांना ब्रि.विन्गेट यांच्या अध्यक्षतेखाली, १९४२ च्या उन्हाळ्यात झांशी येथे प्रशिक्षण दिले गेले. शत्रुच्या पिछाडीस खोलवर जाउन, घातपाताद्वारे त्याची दळणवळण यंत्रणा कशी खिळखिळी करायची, रसद कशी तोडायची किंवा शत्रु बेसावध असतांना अचानक आक्रमण करून त्याची लांडगेतोड कशी करायची वगैरे शिकवले गेले. वरील सैन्यास रसद पुरवठा फक्त विमानांनीच शक्य असल्यामुळे, जंगलात उपलब्ध असणा-या खाद्य सामग्रीवरच कसे तग धरून रहावयाचे हे पण शिकविण्यात आले. त्या भागातील आणखीन एक शत्रु, मलेरियाचा प्रतिकार, कोठलीही चिकित्सा सुविधा नसतांना, कसा करावयाचा ह्याचेपण प्रशिक्षण देण्यात आले.
प्रत्येक सैनिकाजवळ त्याची रायफल व काडतुसे, ग्रेनेडस्, खूखरी, ७ दिवसांचे अन्न, झोपण्यांस चटई आणि एक युनिफार्म, असे एकूण ३३ किलो वजनाचे सामान दिले जात असे. ह्या सैनिकांची नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे, बटालियन व ब्रिगेडमध्ये विभागणी न करता, त्यांचे स्वयंपूर्ण असे आठ गट तयार करण्यात आले.
पहिली मोहीम : Operation Longcloth
चिन्डीटस् नी १३ फेब्रुवारीला चिंदविन नदी औलांडून ब्रम्हदेशात प्रवेश केला. दोन गटांपैकी एकाने मुख्य दक्षिणोत्तर रेल्वे मार्ग उडविला, पण दुस-या गटाला जपानी प्रतिकारामुळे परत फिरावे लागले. उरलेल्या पाच गटांनी तोच रेल्वे मार्ग आणखीन ७० ठिकाणी उखडून पूर्णपणे निकामी केला.
चिन्डीटस् नी १३ फेब्रुवारीला चिंदविन नदी औलांडून ब्रम्हदेशात प्रवेश केला. दोन गटांपैकी एकाने मुख्य दक्षिणोत्तर रेल्वे मार्ग उडविला, पण दुस-या गटाला जपानी प्रतिकारामुळे परत फिरावे लागले. उरलेल्या पाच गटांनी तोच रेल्वे मार्ग आणखीन ७० ठिकाणी उखडून पूर्णपणे निकामी केला.
ब्रि.विन्गेटचा रिपोर्ट वाचून प्रधानमंत्री विन्सटन चर्चिल अत्यंत प्रभावित झाले व त्यांना आपल्याबरोबर अमेरिकन राष्ट्रपतींच्या भेटीसाठी, क्यूबेकला घेउन गेले. रूझवेल्ट यांनी अमेरिकन वायुदलाला, चिंडीट्सना मदत करण्याचे आदेश दिले.
दुसरी मोहीम : Operation Thursday
६०० उड्डाणांच्या मदतीने ब्रिगे. कालवर्ट यांच्या ७७व्या ब्रिगेडचे ९००० सैनिक शत्रुच्या पिछाडीस उतरविण्यात आले. २४ ते २७ मार्च १९४४ दरम्यान जपानी सैन्याबरोबर अत्यंत भीषण हातघाईचे युद्ध झाले ज्यांत संगिनींचा व खूखरींचा मुक्तपणे वापर केला गेला.
दुर्घटना :
Brig. Orde Wingate |
२४ मार्च १९४४ रोजी वायुसेनेच्या अधिका-यांशी चर्चा करण्यासाठी विन्गेट मणिपुरच्या, ईंफाळ ह्या गावी आले. ब्रम्हदेशात परत जातांना त्यांचे विमान वादळात सापडून कोसळले व त्यांच्यासकट सगळे प्रवासी ठार झाले.
त्यानंतर आझाद हिन्द फौज व जपानी सैन्याचा वेढा भारताच्या सीमेवर कोहिमा आणि इंफाळ येथे आवळला गेल्यामुळे चिंडीट्सना आपली गनिमी कारवाई आवरण्या विषयी सांगण्यात आले व ते पायदळाच्या सैनिकांना येऊन मिळाले व अशा प्रकारे ह्या गनिमी युद्धाचा शेवट झाला.
उपसंहार :
ब्रिगे. विन्गेट व चिंडीट्सच्या स्मरणार्थ, लंडन येथे रक्षा मंत्रालयाच्या शेजारी एक स्मारक उभारण्यात आले. ज्याचे उद्घघाटन दि. १६ ऑक्टोबर १९९० ला प्रिन्स फिलीप यांनी केले. चिंडीट्सपैकी एका सर्वांत वयस्कर व्यक्ती, श्री. लेस्टर हडसन यांचे निधन, त्यांच्या शंभरीच्या सहा महिने आधी, नुकतेच, दि. १७ एप्रिल २०२० रोजी इंग्लंडमधील ब्रडफोर्ड गांवी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने झाले.
Logo on Chindit's memorial in London |
दैवदुर्विलास :
मित्रांनो! छत्रपति शिवाजी महाराजांनी प्रचलित केलेल्या गनिमी काव्याचे प्रशिक्षण, राणी लक्ष्मीबाईंच्या झांशीत घेऊन, त्याचा उपयोग जपानी सैन्याबरोबरच, नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांविरूद्ध केला गेला, हा सुद्धा केवढा मोठा दैवदुर्विलास आहे.
दिलीप कानडे
संदर्भ:
1. विकीपीडीया
2. World War Two: by Martin Gilbert
3. Second World War: by Capt. Basil Liddlehart
No comments:
Post a Comment