ऊंच ऊंच
गं जाऊ दे
सये तुझा
झोका
संघर्षाच्या
खड्ड्यांमधे
लपलाय
सुंदर नवा मौका...१
कोणी कुठे
कमी
तिथे ठाक
उभी
बाजीप्रभू
होऊनी...२
आदिमाया तूही तूच
तूच नवखंड
पृथ्वी
तूच तांडव
शिवाचे
तूच
समर्पित भक्ती..३
नको समजू स्वतःला
अबला नाहीस तू नारी
तुझ्याच
हाती असे
तुझ्या
झोक्याचीच दोरी..४
हो निर्भय, हो तू स्वतंत्र
हवा आनंद
जीवनी
मरण बरे, पण
नको
परावलंबी..५
लाज वाचव
तुझी तू
नाही
येणार श्रीहरी
घे हाती
त्याचे चक्र
अन् तूच
वाजव बासरी..६
देवसोनाराने
तुला
मनभर
घडवले
तूच
आदिशक्ती माया
तूची
ब्रह्म गं ल्यायले!!..७
स्मिता शेखर कोरडे
No comments:
Post a Comment