आई... आई....

 


तुझ्या पदराला पांघरून घेते...

हृदयाशी तुझ्या संवाद साधून घेते...

 

दिवे लागणीला चाहुल तुझी येते...

डोक्यावर हात मग तो फिरवून जाते...

स्पर्शाचा भास मग तो होतो....

आठवणींचे काहुर उठवून जाते...

तुझ्या पदराला पांघरून घेते....

 

मनाचा मोगरा तो फुलवून गेली...

मनीचे गुज ते सांगुन गेली...

कुंचल्यासवे चित्र रेखाटुन घेते...

भावनांना त्या साठवून घेते...

तुझ्या पदराला पांघरून घेते...


स्नेहा विरगांवकर




1 comment: