'आकाश झेप' भाग १८: 'अवकाश वसाहत'


                                                

कल्पना चित्रचंद्रावरील इग्लू (सौजन्य: techgenyz.com)

        प्रथमतः मानवाच्या अगाध कल्पनाशक्तीला सलाम! विकास सिद्धांतानुसार एकपेशीय सजीवापासून उत्क्रांती होता होता, कीटकांपासून ते माकड, आणि मानवापर्यंतचा विश्वाचा अखंड प्रवासत्यात कमी की काय, म्हणून मानव 'आकाशझेप', 'अवकाशझेप' आणि आता 'अवकाश वसाहत' यापर्यंतचं स्वप्न पाहतोय. मजेशीर गोष्ट अशी की, विविध प्रयोगांसाठी मानवासोबत माकड, कुत्रा, मांजर, कासव, उंदीर, ससा, मासा, बेडूक, कोळी आणि कीटकांसह विविध प्रकारचे प्राणी आतापर्यंत अवकाशात पाठवण्यात आले आहेतभारतीय अंतराळ संस्था 'इस्रो' चंद्रावरील अंतराळवीर सुरक्षितपणे राहू शकतील अशा संरचनेवर संशोधन करत आहेनिर्वात (vacuum) वातावरणात रहिवाशांना जास्तीत जास्त संरक्षण देण्यासाठी चंद्रावरील संरचना 'इग्लू'सारख्या घुमटाच्या आकाराच्या असू शकतात, ज्यामध्ये तापमान हे कमालीच्या दरम्यान बदलू शकते. (जेव्हा सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावर येतो तेव्हा तापमान २६० अंश फॅरेनहाइट (१२७ अंश सेल्सिअस) पर्यंत पोचू शकते. जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा तापमान उणे २८० फॅ (उणे १७३ सेल्सिअस) पर्यंत खाली जाऊ शकते.)

        'पृथ्वीवर माणूस उपराच' हे पुस्तक म्हणजे प्राध्यापक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी 'व्हॉन डेनिकेन'च्या संशोधनाचा मागोवा घेत मानवाच्या अनैसर्गिक निर्मितीबद्दल मांडलेल्या कल्पना आहेत. 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक म्हणजे जागतिक कीर्तीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे सूर्य, तारे, ग्रह, ग्रहणे, कॄष्णविवरे, कॄष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार अशा आकाशाच्या गूढगर्भामध्ये खूप काही दडलेल्या गोष्टींचं दर्शन होय.

१९५७ च्या हॉलिवूडच्या 'ट्वेन्टी मिलियन्स माईल्स ऑफ अर्थ', पासून 'एलियन्स, एलियन्स वर्सेस प्रिडेटर, अवतार, सायन्सइंडिपेन्डेन्स डे, मेन इन ब्लॅक, डिस्ट्रिक्ट नाइन, वॉर ऑफ द वर्ल्ड, स्पेसीज, ऑब्लिव्हियॉन, असे अनेक चित्रपट, तसेच 'कोई मिल गया, पी. के.' हे भारतीय चित्रपट आले, गाजले; जे आपल्याला परग्रहावरील सृष्टीचे कुतूहल अधोरेखित करतात. परग्रहावरील आपल्या नातेवाईकाला शोधण्यासाठी जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी 'व्हॉयेजर' या यानाद्वारे मोहीम आखली. १९७७ साली सोडलेल्या या  यानाने प्लूटो ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या बाहेरच्या अंतरिक्षामध्ये प्रवेश केला.

        भारतीय पुराणकथा, ग्रीक कथा आणि बऱ्याच संस्कृतीत परग्रहवासियांचा उल्लेख आढळतो. पुष्कळदा परग्रहवासीयांच्या तबकड्या (UFO) त्यांच्या पृथ्वी भेटी अशा कथा, अफवा आपण वाचतो. संयुक्त राष्ट्रांतर्फे उडत्या तबकड्यांविषयी अभ्यास करण्यासाठी व सदस्य राष्ट्रांत माहितीची देवघेव करण्याकरिता 'आऊटर स्पेस ग्रुप' 'आऊटर स्पेस कमिटी' अशा दोन समित्या स्थापन केलेल्या आहेतपरग्रहवासीयांना शोधण्याची सर्वात मोठी व खर्चिक मोहीम 'ब्रेक थ्रू इनिशिएटिव्ह' ही २०१५ साली सुरु झालीदुर्बिणी, रडार यांद्वारे लाखो तारे, अनेक आकाशगंगा यांचा शोध घेतला जात आहेपृथ्वीवरील मानवापेक्षाही दुसरीकडे प्रगत जीवन असल्यास त्यांच्याद्वारे  पाठविले जाणारे संकेत शोधण्याचा प्रयत्न याद्वारे चालू आहे. खगोलशास्त्रज्ञ डॉ. 'स्टीफन हॉकिंग' यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या मोहीमेचे 'ब्रेक थ्रू लिसन' आणि 'ब्रेक थ्रू मेसेज' असे दोन टप्पे आहेत. यामध्ये अनुक्रमे 'परग्रहवासीयांचे संदेश ऐकणे', 'परग्रहवासीयांना संदेश देणे' असे त्यांचे नियोजन आहेपरग्रहवासीय असतील या आशेमुळेच पृथ्वीवरील मानवजातसुद्धा, परग्रहावर वसाहत करण्याची स्वप्ने पाहत नसेल ना? असं मानलं जात आहे की, क्षणाक्षणाला वाढणारी लोकसंख्या, त्यासाठीची लागणारी ऊर्जा, आणि पृथ्वीवरील ऊर्जेचे मर्यादित साठे यावर सद्यस्थितीला असणारा एक उपाय म्हणजे 'अवकाश वसाहत'. अंतराळ निवासस्थान (याला स्पेस सेटलमेंट, स्पेस कॉलनी, स्पेस सिटी, ऑर्बिटल हॅबिटॅट, ऑर्बिटल सेटलमेंट किंवा ऑर्बिटल कॉलनी देखील म्हणतात.) हे स्पेस स्टेशन किंवा हॅबिटॅट मोड्यूलपेक्षा राहण्याच्या सदनिकांचे अधिक प्रगत स्वरूप आहे, ज्यामध्ये ते कायमस्वरूपी वसाहत - 'हिरवे निवासस्थान' म्हणून अभिप्रेत आहे. अद्याप कोणतेही अंतराळ निवासस्थान बांधले गेले नाही, परंतु अनेक रेखांकन संकल्पना, वास्तववादाच्या वेगवेगळ्या प्रमाणात, अभियंते आणि विज्ञान-कथा लेखकांकडून प्रकाशित झाल्या आहेत. संभाव्य अवकाश वसाहतीच्या स्थानांपैकी पृथ्वीचा चंद्र, लाग्रांज पॉईंट्स (L4 L5), बुध, शुक्र, मंगळ, लघुग्रह पट्टा, इतर ग्रहांचे चंद्र, इतर सूर्यमाला अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यासाठी अवकाश कायदा (Space Law) हे एक मोठे कायदेशीर क्षेत्र बनले आहे, ज्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय करारांचा समावेश आहे.

        'नील सिलेंडर (ज्याला ओ'नील कॉलनी देखील म्हणतात) ही अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेरार्ड के. 'नील यांनी त्यांच्या १९७६ च्या 'द हाय फ्रंटियर: ह्यूमन कॉलनीज इन स्पेस' या पुस्तकात प्रस्तावित केलेली अंतराळ वसाहत संकल्पना आहे. 'नीलने २१व्या शतकासाठी चंद्र आणि नंतर लघुग्रहांपासून काढलेल्या सामग्रीचा वापर करून अवकाशाच्या वसाहतीचा प्रस्ताव मांडला.

                    

छायाचित्र'नील सिलेंडर (एक अंतराळ वसाहत संकल्पना)

               ज्युपिटर आयसी मून एक्सप्लोरर (JUICE) हे युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) द्वारे विकसित केले जाणारे इंटरप्लॅनेटरी स्पेसक्राफ्ट आहे, ज्यामध्ये 'एअरबस डिफेन्स आणि स्पेस' हे मुख्य कंत्राटदार आहेत. हे मिशन गुरूच्या तीन गॅलिलियन चंद्रांचा अभ्यास करेल.गॅनिमेड, कॅलिस्टो आणि युरोपा'. 'गॅनिमेड' हा गुरु ग्रहाचा एक उपग्रह असून त्याच्यावर पृथ्वीपेक्षा जास्त पाणी आहेया तिन्हींच्या पृष्ठभागाखाली द्रव पाण्याचे महत्त्वपूर्ण घटक असल्याचे मानले जाते, ज्यामुळे तेथे मानवाला राहण्यायोग्य संभाव्य वातावरण असू शकतेअवकाश वसाहतीची अनेक कारणे आहेतपृथ्वीवरील आपत्ती (नैसर्गिक किंवा मानवनिर्मित) पासून मानवी संस्कृती व जैवमंडलाचे अस्तित्व जपणे, मानवी समाजाच्या विस्तारासाठी अंतराळातील प्रचंड संसाधनांचा वापर करणेकोणत्याही परिसंस्थेचा (Ecosystem) नाश न करता किंवा स्थानिक लोकांना विस्थापित न करता विस्तार करणेपृथ्वीवरील लोकसंख्येचा दबाव कमी करणे आणि उद्योगांना पृथ्वीपासून दूर नेऊन पृथ्वीला मदत करणे.

        अवकाश वसाहतीचे अनेक फायदे सुध्दा आहेत, जसे की अमर्याद सौर ऊर्जेचा सुयोग्य वापर, अवकाशातील व परग्रहावरील गुरुत्वाकर्षणाचा वापरलघुग्रहांवरील खनिजे, ऑक्सिजन, पाणी, इत्यादींचा मुख्य अवकाश वसाहतीवर पुरवठ्याची शक्यता, पृथ्वीवरील लोकसंख्येचे अवकाशात व्यवस्थापन, अवकाश पर्यटन, खेळ, मनोरंजन, अवकाशातील पुढील टप्प्यांवर जाण्यासाठी स्थानके उभारणे, इत्यादीअवकाश वसाहतीसाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आहे: ऑक्सिजन, प्रकाशसंश्लेषण इत्यादी प्रकारचे योग्य वातावरण, अन्न उत्पादन, कृत्रिम गुरुत्वाकर्षण व स्थिती नियंत्रण, उष्णता व रेडिएशनपासून संरक्षण, अंतराळ ढिगारा (Space Debris), उल्का, धूळ इत्यादींच्या संभाव्य प्रभावांना तोंड देणे, इत्यादी.

        टोटल रिकॉल (१९९०), रेड प्लॅनेट (२०००), ख्रिस्तमस ऑन मार्स' (२००८), सेटलर्स (२०२१) सारख्या चित्रपटांनी मानवाकडून मंगळाच्या वसाहतीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तर खऱ्या जगामध्ये, अनेक खाजगी कंपन्यांनी मंगळावर वसाहत बनवण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. अंतराळ वसाहतीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांमध्ये एलोन मस्क, डेनिस टिटो आणि बास लॅन्सडॉर्प यांचा समावेश आहे. नॅशनल स्पेस सोसायटी, स्पेस फ्रंटियर फाउंडेशन, मार्स सोसायटी, स्पेस सेटलमेंट इन्स्टिटयूट, स्पेस-एक्स, स्पेस स्टडीज इन्स्टिटयूट अशा अनेक संस्था अवकाश वसाहतीमध्ये योगदान देण्यास सज्ज झाल्या आहेत. सर्वांत चर्चेत असलेली 'स्पेस-एक्स' संस्थेची मंगळ मोहीम! हा मंगळाच्या अंतिम वसाहतीकरणाच्या सुविधेसाठी 'एलोन मस्क' आणि 'स्पेस-एक्स' यांनी सुरू केलेला विकास कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात पूर्णपणे पुन्हा वापरता येणारी प्रक्षेपण वाहने, मानव-सुरक्षित अंतराळयाने, इंधन साठा, जलदपणे ये-जा करण्यासाठी अवकाशयान स्थानके अशा गोष्टी समाविष्ट आहेत. २०२४ पर्यंत मंगळावर पहिले मानवरहित यान व २०२६ पर्यंत मंगळावर पहिला मानव उतरवणे हे 'स्पेस-एक्स' चे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. किती विस्मयकारक! हो ना?

कल्पना चित्र: 'स्पेस-एक्ससंस्थेची 'मंगळ वसाहत'



जाता जाता शेवटीकुसुमाग्रज तथा वि.वाशिरवाडकर यांच्या प्रेरणेनेत्यांची माफी मागून मी दोन ओळी लिहितो,

"चला उभारा शुभ्र विमाने ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या आकाशाला,

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, क्षितीजा तुला पामराला!"

विशेष तळटीप: 'आकाशझेप' लेखमालेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुम्हा वाचकांचा खूप आभारी आहे

(संदर्भविकिपीडियाइंटरनेटस्पेस-एक्स)


राकेश शांतीलाल शेटे 


विमानशास्त्र अभियंता
हवाई व्यवसाय प्रशिक्षक, बेंगलोर
संपर्क: 8951655367

 

 


3 comments:

  1. आकाशझेप चे सर्व 18 भाग खूपच छान वाटले. राकेश तुझे विशेष कौतुक, आणि तुझ्या पुस्तकासाठी खूप शुभेच्छा.💐💐

    ReplyDelete
  2. Very deeply information blog.....Thank you for wonderful blog.

    ReplyDelete
  3. This information is very helpful for our knowledge.
    So many companies are taking positive response and research on it.we undastand from this Article.
    Thank you so much sir for increasing our knowledge

    ReplyDelete