आकाशात झेपावताना...

 

छायाचित्र :सुमेघा आशुतोष 


बरसला रिमझिम पाऊस

आवेगले आकाश

धरतीच्या कुशीत


या आकाशात झेपावल्या,

तरंगल्या नौका

मस्त डुलत ऐटीत...

 

चुंबित पानां फुलांना

स्पर्शले वृक्षांचे शेंडे....

निघाल्या वेचून आणायला

भविष्यातले सोनेरी क्षण

 

पोचल्या ढगांच्यापार

आल्या लाटांवर लाटा.

आले ढगांचे पुंजके

वादळ होऊन...

 

अंधाराचा पडदा घेऊन....

तरल्या तरीही नौका

कारण.... कारण...

त्यांना मृदेनी दिला होता

कणखर खंबीर आधार....!!



स्मिता शेखर कोरडे


                 

 







1 comment: