"उडनेकी प्यास है, क्योंकी दिलमे मार्स है”... भारतीयांना प्रेरणादायी अशा 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटातील ओळी, त्या गुणगुणतच मी हा लेख लिहायला घेतला. सूर्य मालेमध्ये सूर्यापासून पृथ्वी हा तिसरा, तर मंगळ (मार्स) हा चौथा ग्रह. त्याच्या जमिनीतील लोहामुळे तो लाल आहे. म्हणून मंगळाला 'लाल ग्रह' असेही म्हणतात. पृथ्वीला जसा एक चंद्र आहे, तसे मंगळाला दोन चंद्र (उपग्रह) आहेत, आणि त्यांची नावे 'फोबोस' व 'डेमोस' अशी आहेत. एक मंगळ वर्ष, म्हणजे पृथ्वीवरील ६८७ दिवस. मंगळावरील सरासरी तापमान उणे ६० डिग्री सेल्सियस असते, कारण तो सूर्यापासून पृथ्वीपेक्षा जास्त लांब आहे. तेथील वातावरणामध्ये मुख्यतः कार्बन डायऑक्साइड, आणि काही पाण्याची वाफ आहे.
छायाचित्र: १) पृथ्वी आणि मंगळ ग्रह, २) मंगळ ग्रह आणि त्याचे दोन चंद्र: 'फोबोस', व 'डेमोस' |
जगात काही थोर खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले. आर्यभट, पहिले (सहावे शतक) यांनी 'पृथ्वी स्वतःभोवती फिरते', हा सिद्धांत ठामपणे मांडला. 'कोपर्निकस' यांनी 'पृथ्वी इतर ग्रहांसह सूर्याभोवती फिरते', असे सांगितले. पुढे अभ्यास करून 'जर्दानो ब्रुनो' यांनी "असंख्य सूर्य आहेत आणि या सूर्याभोवती सारख्याच प्रकारे फिरणाऱ्या अनंत पृथ्वी आहेत, जसे आपण हे सात (ग्रह) आपल्या जवळ असलेल्या या सूर्याभोवती फिरताना पाहतो." असे सांगितले. त्यापुढे जाऊन 'गॅलिलिओ' यांनी 'पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. म्हणून तर दिवस उजाडतो, रात्र होते. म्हणूनच तर ऋतूंचे सोहळे इथे दिसतात.' हे दाखवून दिले. १६०९ साली 'गॅलिलिओ' यांनी आपल्या दुर्बिणीतून प्रथमतः मंगळ ग्रह पाहिला.
सोव्हिएत यूनियन (रशिया), अमेरिका या देशांची १९६० पासून मंगळ ग्रहावर प्रथम पोहोचण्याची जणू शर्यतच चालू
होती. अमेरिकेने मंगळावर पहिला यशस्वी 'प्रोब' पाठवला, तर सर्वप्रथम 'सोव्हियेत युनियन' ने मंगळावर आपले यान यशस्वीरीत्या उतरवले.
जपान, यूरोप, चीन, भारत, यू. ए. ई. हे देशसुद्धा या स्पर्धेत हळूहळू सामील झाले.
'मरिनर-९' या रोबोटिक अंतराळयानाने १९७२ साली प्रथमतः संपूर्ण मंगळ ग्रहाचे
छायाचित्रण केले. मंगळावर पाणी असल्याची पुष्टी मिळाली.
छायाचित्र: भारतीय 'इसरो'चे 'मंगळयान' (मार्स ऑर्बिटर मिशन - MOM) |
'मंगळयान' चा मुख्य उद्देश खालील प्रमुख कार्यांसह उपग्रह डिझाइन, नियोजन आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.
·
मंगळाच्या
कक्षेत प्रवेश करणे, मोहिमेच्या सर्व टप्प्यांवर अंतराळयानाची देखभाल करणे,
वीज, दळणवळण या गरजा पूर्ण करणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वायत्त सुविधा तयार करणे.
· 'मंगळयान'चा वैज्ञानिक उद्देश - मंगळाच्या पृष्ठभागाच्या आकार स्थलाकृति आणि खनिजशास्त्राचा अभ्यास करणे, रिमोट सेन्सिंग तंत्राचा वापर करून मिथेन आणि कार्बन डायऑक्साइडसह मंगळाच्या वातावरणातील घटकांचा अभ्यास करणे, मंगळाच्या वरच्या वातावरणावरील सौर वारा, किरणोत्सर्ग आणि बाह्य अवकाशाच्या गतिशीलतेचा अभ्यास करणे, या मोहिमेद्वारे मंगळाच्या चंद्राचे निरीक्षण करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करणे.
'प्रोब' हे एक अंतराळयान असते, जे वैज्ञानिक माहिती गोळा करण्यासाठी अवकाशातून प्रवास करते.
'प्रोब'मध्ये अंतराळवीर नसतात. शास्त्रज्ञांना अभ्यास करण्यासाठी प्रोब पृथ्वीवर माहिती पाठवतात.
सुरुवातीच्या अंतराळ संशोधनामध्ये चंद्र आणि इतर ग्रहांचा अभ्यास
करण्यासाठी अंतराळात 'प्रोब' पाठवणे समाविष्ट होते. मरिनर-२ हे शुक्र ग्रहाचा अभ्यास करणारे पहिले प्रोब होते आणि मरिनर-४ ने १९६५ साली मंगळासाठी उड्डाण केले. या 'प्रोब'ने फोटो आणि माहिती पृथ्वीवर पाठवली. आता पृथ्वी आणि अवकाशातील
वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी असंख्य प्रोब्स प्रक्षेपित करण्यात आल्या आहेत.
सूर्यमालेतून निघालेले आणि खोल अंतराळात फिरणारे
'व्हॉयेजर्स' हे प्रसिद्ध प्रोब्स आहेत.
'उपग्रह' (सॅटेलाईट) ही एक वस्तू आहे जी एखाद्या ग्रह किंवा ताऱ्याभोवती फिरते.
उदाहरणार्थ, चंद्र हा एक उपग्रह आहे, कारण तो पृथ्वी या ग्रहाभोवती फिरतो.
तथापि, सामान्य वापरात 'उपग्रह' हा शब्द अंतराळात सोडले जाणारे आणि पृथ्वी किंवा अंतराळातील
दुसर्या शरीराभोवती
प्रदक्षिणा घालणाऱ्या अंतराळयानाला सूचित करते. मुख्यत्वे जगभरातील टीव्ही सिग्नल आणि फोन कॉल्स बीम करण्यासाठी
वापरले जाणारे संप्रेषण उपग्रह ही उदाहरणे आहेत. जीपीएस उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात.
'लँडर' हे एक अंतराळ यान जे हळूवारपणे उतरते, नंतर तेथे विश्रांती घेते आणि इतर सर्व कार्ये करते,
जी त्याला करावी लागतात. 'रोव्हर' हे ग्रहांच्या पृष्ठभागाच्या शोधासाठी डिझाइन केलेले रोबोटिक
वाहन आहे, जे ग्रह किंवा चंद्रावरील घन पृष्ठभागावर जाऊ शकते. आतापर्यंत 'नासा' ने मंगळ ग्रहावर असे पाच 'रोव्हर' तैनात केले आहेत.सोजर्नर, स्पिरिट, अपॉर्च्युनिटी, क्युरिऑसिटी आणि पाचवे 'परसेवेरेन्स' रोव्हर जे जुलै २०२० मध्ये पाठवले गेले आणि १८ फेब्रुवारी,
२०२१ ला ते मंगळावर उतरले. त्याबरॊबर 'इंजेन्युइटी' हे ड्रोन (हेलिकॉप्टर) सुद्धा आहे. 'रोव्हर्स' वैज्ञानिकांना ग्रहाचे विविध भाग कशापासून बनलेले आहेत,
हे शोधण्यात मदत करतात. प्रत्येक खडकातील विविध रसायनांचा अभ्यास करून
'रोव्हर' वेगवेगळ्या भागात फिरू शकतात. हा डेटा शास्त्रज्ञांना वेळोवेळी बदलणाऱ्या वातावरणाविषयी बरीच
माहिती देतो.
छायाचित्र: 'परसेवेरेन्स' रोव्हर आणि 'इंजेन्युइटी' ड्रोन |
काही रंजक माहिती: आज मंगळावरील जवळजवळ सर्व पाणी बर्फासारखे अस्तित्वात आहे, शिवाय वातावरणात बाष्प म्हणूनही कमी प्रमाणात पाण्याचा अंश आहे. पृथ्वीवरून सूर्याचा जेवढा आकार दिसतो, त्याचा निम्मा आकार मंगळावरून दिसतो. मंगळावरून दिसणारा सूर्यास्त हा निळसर असतो. मंगळावर एखाद्या वस्तूचे वा व्यक्तीचे वजन हे पृथ्वीवरील वजनाच्या फक्त ३७.८३ % असू शकते. मंगळाच्या पृष्ठभागाशी पृथ्वीवरील 'जॉर्डन' देशाच्या 'वादी रम'चे साम्य हे चित्रपट चित्रीकरण आणि पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.
छायाचित्र: पृथ्वीवरील 'जॉर्डन' देशाच्या 'वादी रम'मधील डोंगर व लालसर माती |
'आंतरग्रहीय स्पेसफ्लाइट' म्हणजे दोन किंवा अनेक ग्रहांमधील अंतराळयानाचा प्रवास.
६०च्या दशकापासूनच सूर्यमालेतील बुध,
शुक्र, मंगळ, 'सेरेस', लघुग्रह पट्टा, गुरु, शनी, टायटन, युरेनस, अगदी 'प्लूटो' या ग्रहावर 'वोयेजर', 'पायोनियर', 'मेसेंजर', 'व्हेनेरा' असे अनेक 'स्पेसक्राफ्ट' पाठवले गेले आहेत.
राकेश शांतीलाल शेटे
विमानशास्त्र अभियंता, हवाई व्यवसाय प्रशिक्षक, बेंगलोर
संपर्क: 8951655367
Amazing information about Mangal and Mangalyan. Your thoughts and imagination are very fabulous.You have explained through movies so people are getting interest to read .Thank you for such a great informative article.
ReplyDeleteमा. राकेश शेटे जी, आपण लिहिलेला लेख अप्रतिम आहे. आपण वैज्ञानिक क्षेत्रात असूनदेखील इतकं सुंदर लिहिलय ह्याचं अप्रूप वाटलं. मला इतरही लेख वाचायला आवडतील. मला इतर लेखांची लिंक पाठवू शकाल का? लेखांसाठी लिंक ओपन होत नाहीय. माझ्याकडून काहीतरी घोळ होतोय.
ReplyDeleteसुंदर उपक्रमाबद्दल आपलं अभिनंदन. आमच्यासारख्यांना ती एक पर्वणीच आहे. धन्यवाद.
सौ.विद्या चिडले.
दर महिन्याचा कट्टा open करुन आपण त्यातील आकाशझेप मधील लेख वाचू शकता. लेखमाला संपल्यावर आम्ही 'संग्रहित लेखमाला'ह्या tab खाली ह्या लेखमालेतील सर्व लेख ठेऊ.
Deleteखूप धन्यवाद!
Deleteखूप छान
ReplyDeleteया लेख वाचून खुप काही माहीत झाल. छान लेख होता सर!
ReplyDeleteNice sir, we are looking for more like this
ReplyDelete