आयुष्य हे सुंदरच असतं
जसं बघितलं तस दिसतं
कसं बघावं ज्याचा त्याचा प्रश्न
कधी गारवा कधी उष्ण
आयुष्य सुमधुर गाणं जणू
जसं आवडेल तसं म्हणू...
आपलाच ताल अन् आपलेच बोल,
कधी तबला अन् कधी ढोल
आयुष्य मोहक अत्तर जसं
न दरवळता राहीलंच कसं
किती ही लपवलं तरी गवसतं
अंधारात ही दरवळत राहतं
आयुष्य म्हणजे रंगबिरंगी चित्र,
वेगवेगळ्या रंगांचे अनेक मित्र
कधी ऐकावं कधी बोलावं
मन अगदी मोकळं करावं
आयुष्य म्हणजे नदी खळखळणारी
न थांबता सतत वाहणारी
राहून गेलेले मागे सोडत
येणाऱ्याचे स्वागत करावे हसत
आयुष्य म्हणजे श्रावण धारा
रिमझिम सरी अन् इंद्रधनू न्यारा
कधी चिखलात उमललेलं कमळ
कधी छोटासा अंकुर निर्मळ
आयुष्य म्हणजे प्रेम
कसं होईल नाही नेम
सोबत तर काही आणले नाही
तरी सगळं माझं म्हणत राही
आयुष्य म्हणजे प्रार्थना
वंदन करावे प्रभू चरणा
काय असावे मागणे
जे माझे ते त्याचेच देणे
प्राजक्ता सरपटवार पाठक
👌👍
ReplyDeletesurekh
ReplyDelete