२-३ मार्चपासून
हलकीशी कुणकुण लागलेल्या Novel Corona Virus ने भारताला साधारण १२-१३ मार्चनंतर चांगलाच
विळखा घालायला सुरूवात केली आणि भारतात सर्वच क्षेत्रात एकच खळबळ सुरू झाली. Social
Distancing, साबणाने हात धूत राहणे, २२
मार्चचा जनता कर्फ्यू यांसारख्या उपाय योजना करूनही अखेर भारतासारख्या विशाल
लोकसंख्या असलेल्या देशाला देशांतर्गत Lock Down चा निर्णय
घ्यावा लागला. आजपर्यंत सुरळीत चालू असणाऱ्या अनेक यंत्रणा थांबवाव्या लागल्या.
कुशल आणि अत्यंत
सेवाभावी वृत्तीने हाताशी असलेला तुटपुंजा staff, योजनाबद्ध कामाची आखणी करून देणारे प्रदीप ओक, सुब्रमण्यम् यांसारखे संस्थेचे स्वयंसेवक यांच्यामुळे हे साध्य होत गेले. स्वयंसेवकांचा
वरदहस्त लाभलेल्या 'अदम्य चेतना' मध्ये स्वयंसेवकांची फौज जमा होत गेली.
हजारांच्या आकड्यात जेवण बनवायला सुरूवात झाली. “Plasticबेडा
बेडा“ हा संस्थेचा नेहमीचा नारा असला तरी “जान है तो जहाँ है” याकरिता यावेळेस तो बाजूला सारावा
लागला. Aluminium Foil चे डबे की Food grade प्लास्टिकचे डबे यांत निवड करायची होती. किंमत थोडी जास्त पण जेवण
राहण्याच्या, टिकण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असलेले, पुनर्वापर करण्यायोग्य प्लॅस्टिक डबे निवडण्यात आले. अखेर ३० मार्चपासून
दहा हजार (१००००) लोकांसाठी जेवण सुरू झाले.
कर्नाटक Govt. च्या Labour Department बरोबर समन्वय साधून ते
सांगतील तेथे सांगितलेल्या संख्येइतके जेवण
पोचवायचे होते. आर्थिक मदतीसाठी लोकांना आवाहन करण्यात आले. मदतीचे अनेक हात पुढे
सरसावले. सरकारनेही काही प्रमाणित आर्थिक मदत देऊ केली. अनेकांनी शेतात पिकणारा
भाजीपाला मदतीच्या रूपात पाठवला. अदम्य चेतनाच्या ‘Zero Garbage’ किचनमध्ये शाळा चालू असताना Mid Day Meal योजनेअंतर्गत
रोजचे पन्नास हजार मुलांचे जेवण तयार होत होते. त्यामुळे जेवण बनवण्याचा प्रश्न
नव्हता. पण एकेका व्यक्तिसाठी जेवण pack करण्याचा प्रश्न
होता. अखेर अनेक
स्वयंसेवक धावून आले. ९ वाजेपर्यंत जेवण तयार होऊन ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत packing सुरू झाले. ऊन्हाळ्याचे दिवस, PPE Kit घालून गरम जेवण pack करणे जिकिरीचं काम आहे. पण ६ फुटांचे अंतर राखून, mask, gloves, cap असे PPE kit वापरून स्वयंसेवकांनी हे ही आव्हान स्वीकारले. दुपारी दीड वाजेपर्यंत packing संपत आहे. संस्थेची २-३ वाहने , इतर स्वयंसेवकांची वाहने यातून Labour Dept.ने सांगितलेल्या भागांत, सांगितलेल्या संख्येइतके जेवण जात आहे. टोमॅटो भात, कोबी भात, vegetable पुलाव , पुलीयोगरे यापैकी एक मेनू रोज ठरलेला आहे. २० मार्चपर्यंत एकूण सव्वा तीन लाख लोकांना जेवण देण्यात आले आहे.
जेवणाबरोबरच
ज्यांना घरी स्वयंपाक करणे शक्य आहे, अशा गरजू कुटुंबांना Grocery Kit देण्यात येत आहे. तांदूळ,
कणीक, डाळ, झटपट
बनवण्यायोग्य उप्पीठ असे साधारण ७ किलो धान्याचा यांत समावेश आहे. इथेही packing
चा मोठा प्रश्न आहे. पण स्वत:च्या व्यवसाय क्षेत्रात अग्रणी असलेले
वकील, Engineers, डॅाक्टर्स असे अनेक स्वयंसेवक इथेही मदत
करत आहेत. २० एप्रिल पर्यंत नऊ हजार (९०००) Grocery Kits गरजूंना
पुरवण्यात आले आहेत. Lock down च्या काळात या सगळ्या
कार्यासाठी आवश्यक तो कच्चा माल बाजारातून मागवणे, त्याची
वाहतूक करणे हे सर्व अवघड होत आहे. परंतु कर्नाटक पोलिस दलाने या कामात खूपच मदत
केली आहे.
साहजिकच हातावरचे
पोट असणाऱ्या आणि गावाकडून शहरांकडे स्थलांतरित झालेल्या गरीब जनतेला याचा चांगलाच
फटका बसला. वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे गावाकडे जाता येत नाही. कामधंदा बंद
असल्यामुळे रोजगार नाही. अशा कचाट्यात सापडलेल्या गरीब जनतेसाठी काय करावे सुचत
नव्हते. सर्वच प्रगत राज्यांमध्ये हा प्रश्न भेडसावत असताना कर्नाटक सरकारने
बेंगळुरूमधील सामाजिक संस्थाना मदतीचे आवाहन केले आणि गेली १३-१४ वर्षे सरकारच्या Mid Day Meal योजने अंतर्गत सरकारी
शाळांना पौष्टिक, रुचकर , आरोग्याची
सर्व काळजी घेऊन जेवण देणारी ‘अदम्य चेतना संस्था’ अर्थातच पुढे सरसावली.
३० मार्चपासून
बांधकाम क्षेत्रातील स्थलांतरित कष्टकरी, गरीब जनतेला जेवण देण्याचे ठरले. ठरवले पण साधायचे कसे? हे मोठेच आव्हान संस्थेपुढे होते. २४ मार्चपासून सुरू झालेल्या Lock
Down मुळे बहुतेक सगळा staff गावी गेला होता.
नेहमीचा, मुख्य स्वयंपाकी उपलब्ध नव्हता. परंतु भारताचे
दिवंगत नेते व एक कर्मयोगी श्री अनंतकुमार यांच्याकडून नेहमी प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या
'अदम्य चेतना संस्थेने' माता श्री अन्नपूर्णेश्वरीला श्रद्धापूर्वक वंदन करून हे आव्हान स्वीकारले. संस्थेच्या मुख्य संचालिका श्रीमती
तेजस्विनी अनंतकुमार यांची नेहमी तळागाळातल्या माणसाचे जीवन सुसह्य करण्याची
दुर्दम्य ईच्छाशक्ती याही वेळेस कामाला आली.
कर्नाटक Govt. च्या Labour Department बरोबर समन्वय साधून ते
स्वयंसेवक धावून आले. ९ वाजेपर्यंत जेवण तयार होऊन ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत packing सुरू झाले. ऊन्हाळ्याचे दिवस, PPE Kit घालून गरम जेवण pack करणे जिकिरीचं काम आहे. पण ६ फुटांचे अंतर राखून, mask, gloves, cap असे PPE kit वापरून स्वयंसेवकांनी हे ही आव्हान स्वीकारले. दुपारी दीड वाजेपर्यंत packing संपत आहे. संस्थेची २-३ वाहने , इतर स्वयंसेवकांची वाहने यातून Labour Dept.ने सांगितलेल्या भागांत, सांगितलेल्या संख्येइतके जेवण जात आहे. टोमॅटो भात, कोबी भात, vegetable पुलाव , पुलीयोगरे यापैकी एक मेनू रोज ठरलेला आहे. २० मार्चपर्यंत एकूण सव्वा तीन लाख लोकांना जेवण देण्यात आले आहे.
हे सर्व Corona Virusचे थैमान भविष्यात किती
दिवस चालेल माहित नाही. पण आजच्या या वर्तमानात दुपारच्या भुकेच्या वेळेला,
रोजंदारी बंद झालेल्या, गरीब जनतेच्या पोटात
अन्न घालण्यासाठी, आपल्या भूतकाळातील कामाच्या अनुभवाच्या
जोरावर झटणाऱ्या ‘अदम्य चेतना’ या
संस्थेला, त्यांच्या हजारो मदतीच्या हातांना, आमच्या हजारो हातांनी सलाम!
जगावर आलेल्या या
संकटाचा लवकरच नि:पात होऊन सर्वांचे जगणे सुसह्य होवो हीच त्या जगन्नियंत्याकडे
प्रार्थना!!
Khup mahattvache kam. Abhinandan va dhanyavad.
ReplyDeleteIndeed a great job. It's difficult to manage a home without maid, hats off to all the people, institute who are attached to this noble cause .
ReplyDelete