माणसाने निसर्गाचे अनुकरण (Biomimetics/ Bio-mimicry) करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. जेंव्हा पक्ष्याच्या उडण्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा मात्र सुरुवातीला अपयश आले. कारण पक्ष्याला पंख असतात, तसे त्याने हाताला पिसे लावून उडण्याचा प्रयत्न केला खरा, पण शरीराचे वजन, पंखांचे क्षेत्रफळ अशा बाबी लक्षात घेतल्या नव्हत्या. राइट बंधूंच्या पूर्व काळामध्ये युरोप खंड व जगात इतर ठिकाणी बरेच अयशस्वी प्रयोग झाल्याचा उल्लेख आढळतो, ते आपण 'भाग १' मध्ये पाहिले .
छायाचित्र
(
१८७६
): विल्बर व
ओर्वील
(
राइट
बंधू
) |
विल्बर (एप्रिल
१६
,
१८६७
-
मे
३०,
१९१२)
आणि
ओर्वील
(ऑगस्ट
१९,
१८७१
-
जानेवारी
३०,
१९४८)
हे
अमेरिकेतील
पश्चिम
प्रांतातील
एका
धर्मगुरूच्या
पाच
मुलांपैकी
दोघे
होते.
ते
लहानपणापासून
एकत्र
खेळायचे,
काम
करायचे,
एखाद्या
गोष्टीवर
चर्चा
करायचे. विल्बरला
शाळेत
व
अभ्यासात
जास्त
रस,
तर
ओर्वील
हुशार
तरी
बंडखोर
होता.
दोघेही
आपल्या
कृतीचे
तात्विकदृष्ट्या
समर्थन
झाल्याशिवाय
त्या
कामाचे
पुढचे
पाऊल
उचलत
नसत.
वडिलांनी आणलेल्या उडत्या भोवऱ्याचे आकर्षण यांनाही झाले. 'विमान' या विषयाने त्यांच्या डोक्यात घर केले. जगभरातील प्रयोग, वर्णने यांची माहिती ते वाचायला लागले. ते पतंग बनवू लागले, त्याचा व्यवसायही केला. नंतर घरगुती छापखाना सुरु केला. तिथे दुकानांना लागणारे, रस्त्यावर वाटण्यासारखी छोटी पत्रके छापली जात. विल्बरचा हृदयविकार, आणि नंतर त्यांच्या आई सुसान चे १८८९ ला मृत्यू पावणे, यातून ही भावंडे भावनिकदृष्टया फार जवळ आली. त्यांचा सूर जुळला, तो नंतर त्यांच्या पुढील कामातही दिसून आला. १८९२ ला त्यांनी 'राइट सायकल कंपनी' चालू केली. सुरुवातीला फक्त सायकल विकणे, नंतर जम बसल्यावर सायकल दुरुस्ती व सायकल तयार करणे ही कामे सुरु केली.
|
छायाचित्रे
:
द
राइट
सायकल
कंपनी
, (
डेटन
,
ओहिओ
)
लायब्ररी
ऑफ
काँग्रेस
अँड
अलामी
'
|
१८९७
ला
ओर्वीलला
नव्या
पेट्रोल
इंजिनवर
धावणाऱ्या
गाड्यांचे
आकर्षण
निर्माण
झाले,
ज्याच्याशी
विल्बर
सहमत
नव्हता.
पण
१८९६
पासूनच
त्यांना
'ऑटो
लिलीयंथाल'
यांच्या
प्रयोगाचे
नवल
वाटू
लागले
होते.
हा
जर्मन
अभियंता
आकाशातून
दळण
-
वळण
करण्यासाठी
प्रयाण
करत,
यशस्वी
होतोय
अशी
चिन्हे
होती,
पण
दुर्दैवाने
त्यांचा
ग्लायडर
अपघातात
मृत्यू
झाला.
विल्बरने
मे
१८९९
मध्ये
उड्डाणासंबंधी
माहिती
मिळविण्याविषयी
स्मिथसोनियन
संस्थेशी
पत्र
व्यवहार
केला.
जुलै, ऑगस्ट
महिन्यांमध्ये
-
पंखांना
बाक
(bending)
देण्याची
कल्पना
आणि
पतंगांची
कल्पना
यासंबंधीचे
राइट
बंधूंचे
प्रयोग
यशस्वी
झाले.
राइट
बंधूंनी
१९००
साली
ऑक्टव्ह
शेनयूट
यांना
पत्र
लिहिले.
आणि
विमानाचे
प्रयोग
करण्यासाठी
मार्गदर्शन
-
वजा
विनंती
केली
.
तेंव्हा
शेनयूट
यांनी
फार
महत्वाचा
सल्ला
दिला, 'एकदम
मोठ्या
उड्डाणाचे
धाडस
न
करता,
टप्याटप्याने
व
प्रयॊग
करून
मगच
स्वतःचा
जीव
धोक्यात
घाला.'
हे
पटले
म्हणून
की
काय,
या
दोघांनी
मोठ्या
वयातही
मोठे
पतंग
बनवून
त्याचा
अभ्यास
सुरू
केला.
शेजारी,
लोक
त्यांना
नावे
ठेवू
लागले,
हसू
लागले.
अर्थातच,
त्यांच्याकडे
लक्ष
देण्यात
राइट
बंधुंना
वेळ
नव्हता. 'डेटन'
या
त्यांच्या
राहत
असलेल्या
शहरात
पुरेसा
वारा
नव्हता.
तेंव्हा
त्यांनी
हवामान
खात्याला
पत्र
पाठवून
विनंती
केली
की, 'संपूर्ण
वर्षभर
चांगला
सरासरी
वारा
असेल,
असे
निर्जन
ठिकाण
सांगावे
'.
उत्तरा
दाखल
- 'नॉर्थ
कॅरोलिना'
च्या
किनाऱ्यावरील
'किटी
हॉक'
हे
योग्य
ठिकाण
आहे,
तेंव्हा
आपण
तेथे
असे
प्रयोग
करणार
असल्याचे
नोंद
करीत
आहोत'
असे
हवामान
खात्याकडून
त्यांना
कळविण्यात
आले
.
राइट
बंधूंनी
'किटी
हॉक'
येथे
ग्लायडरच्या
चाचण्या
केल्या.
तसेच
त्यांनी
जुलै,
ऑगस्ट
१९०१
मध्ये
'किटी
हॉक'
च्या
दक्षिण
बाजूला
चार
मैलांवर
असलेल्या
'किल
डेव्हिल'
टेकड्यांवर
दुसऱ्या
ग्लायडर
च्या
चाचण्या
केल्या.
या
चाचण्यांचे
संमिश्र
परिणाम
पाहून
राइट
बंधू
गोंधळले
आणि
निराश
झाले.
सप्टेंबर
मध्ये
शिकागो
येथे
'वेस्टर्न
सोसायटी
ऑफ
सिव्हिल
इंजिनिअर्स'
या
संस्थेमध्ये
विल्बर
ने
भाषण
केले.
त्या
काळात
'डेटन'
येथे
ओर्वील
चे
वात
-
नळावर
(Wind Tunnel)
प्रयोग
सुरु
होते.
१९०२
साली
'किल
डेव्हिल'
टेकड्यावरील
प्रयोग
यशस्वी
झाले. 'वात
-
नळा'
वापरून
उडवलेल्या
ग्लायडरची
चाचणी
यशस्वी
झाली.
त्यानंतर
१९०३
हे
ऐतिहासिक
वर्ष
उजाडले.
त्या वर्षी काय
घडले हे
पुढच्या
भागात
पाहूया
!
संदर्भ
:
1
.
लेख
:
दैनिक
लोकसत्ता,
१५
डिसेंबर,
२००२
(
लेखक
:
माधव
गोपाळ
खरे
,
पुणे
)
2.
पुस्तक
: '
राइट
बंधू
' (
लेखिका
:
आना
स्प्राउल
,
रूपांतर
:
मीना
वैशंपायन
)
खूप मस्त माहिती मिळाली पण आता पुढे काय याची उत्सुकता आहें
ReplyDeleteलवकर लिहावं उत्सुकता न ताणता😀
ReplyDeleteखूपच महत्वपूर्ण लेख... पुढचे भाग ही वाचायला नक्की आवडतील... तुमच्या पुढच्या लिखाणाला खूप खूप शुभेच्छा ��
ReplyDelete