चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. त्याचा शीतल प्रकाश, त्याच्या कला,
चंद्रग्रहण इ. मुळे माणसाला युगानुयुगे त्याचे
आकर्षण आणि कुतूहल वाटत आले आहे. १३ सप्टेंबर,
१९५९ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या पोहोचणारे 'सोव्हिएत युनियन' चे 'ल्यूना २'
हे प्रथम अवकाशयान होते. १९६९ ते १९७२ दरम्यान
चंद्रावर मानव-सहीत (१२ जण)
अशा यशस्वी अमेरिकन चांद्र-मोहिमा सहा वेळा झाल्या.
१९५८ पासून आतापर्यंत जपान, अमेरिका, युरोप, भारत, चीन, इस्राईल सारख्या देशांच्या यशस्वी-अयशस्वी असंख्य मानव-रहित चांद्र-मोहिमा झाल्या आहेत.
२० जुलै, १९६९
रोजी चंद्रावर उतरण्यासाठी अमेरिकेची 'अपोलो ११' ही प्रथम मानवाबरोबरची यशस्वी कामगिरी होती. उड्डाण
झाल्यानंतर चार दिवसातच नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स आणि बझ ऑल्ड्रिन या अंतराळवीरांचं 'ईगल' हे छोटं यान चंद्रावर उतरलं. चंद्रावर पहिले पाऊल कोणी
ठेवले? असं विचारलं की, 'नील आर्मस्ट्राँग'
हे नाव आपल्या तोंडपाठ असते पण दुसरी व्यक्ती माहित नसते. ती व्यक्ती होती - 'ऑल्ड्रिन '. तर कोणत्याही क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्याचेच नाव होते, हा त्यातून बोध! चंद्र पाहताच असे उद्गारवाचक संभाषण
यांचे झाले होते:
Armstrong: "What a spectacular
view!"
Collins: "God, look at that Moon!
Fantastic!"
नील आर्मस्ट्रॉंग (५ऑगस्ट,१९३० - २५ऑगस्ट,२०१२) अंतराळवीर बनण्याआधी
नौदलात होते. ते एरोस्पेस इंजिनिअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापक होते.
आर्मस्ट्रॉंग हे २ तास ३२ मिनिटे आणि ऑल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५
मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. तेथे त्यांनी अमेरिकेचा ध्वज फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व
मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे," असे आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासीयांना
रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते. अंतराळवीर पृथ्वीवर येताना
चंद्राची रहस्यमय माती व प्राचीन खडक अभ्यास व प्रयोगासाठी सोबत घेऊन आले. त्यांनी विज्ञान प्रयोग-साधने, बॅकपॅक, बूट आणि अन्नाच्या पिशव्या यासह अनेक गोष्टी
तिथेच चंद्रावर मागे ठेवल्या. त्यांना चंद्रापासून कोणतेही संक्रमण
किंवा आजार झाला नाही, याची खात्री करण्यासाठी १८ दिवस वेगळे
ठेवण्यात आले. नंतर, ३८ दिवसांच्या
'जायंट लीप' (मोठी झेप) दौऱ्याचा भाग म्हणून संपूर्ण
अमेरिकेत आणि जगभरात त्यांना पाठवण्यात आले.
(छायाचित्र: (डावीकडून) निल आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स, बझ ऑल्ड्रिन ) |
(छायाचित्र: चंद्रावरून पृथ्वी अशी दिसते!) |
(छायाचित्र: १. नील यांनी चंद्रावर ठेवलेले डावे पाऊल. २. 'ऑल्ड्रिन '
अमेरिकी झेंड्याला सलामी देताना) |
चंद्रावरील ही पहिली पदचिन्हे लाखो वर्षांसाठी
तशीच असतील. कारण त्यांना उडवून लावण्यासाठी तिथे
वारा नाही. (अमेरिकेच्या या मानवी चांद्र-मोहिमा आजही वादात आहेत. त्यांच्या या मोहिमांवर रशियाने
बरीच प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत.)
चंद्रयान-१ हे भारतीय
अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रावरील मोहिमेचे अंतराळ यान आहे. चंद्रयान-१ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये
- चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, आणि चंद्रावर
आदळणारा एक - असे दोन भाग आहेत. ध्रुवीय
उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी ११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण २२
ऑक्टोबर, २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून
झाले. नोव्हेंबर ८ रोजी हे यान यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत
पाठवण्यात आले. या मोहिमेची मांडण्यात आलेली प्रमुख उद्दिष्टे:
१) अंतराळयानाचा आराखडा तयार करणे, ते विकसित करणे, त्याचे प्रक्षेपण करणे. तसेच भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने चंद्रयानाला चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थित करणे.
२) यानावरील उपकरणांद्वारे शास्त्रीय प्रयोग करून खालील उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करणे:
· चंद्राच्या पृथ्वीकडील तसेच पलीकडील भागाचा त्रिमितीय
नकाशा तयार करणे.
· चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक मूलद्रव्ये व खनिजे दर्शविणारा नकाशा तयार करणे.
· यामध्ये मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटॅनियम या मूलद्रव्यांचा तसेच रेडॉन, युरेनियम, थोरियम या जड मूलद्रव्यांचा समावेश आहे. भविष्यातील चंद्रावर अलगद उतरणाऱ्या यानांची नांदी व चाचणी म्हणून "मून इम्पॅक्ट प्रोब" चंद्रावर विशिष्ट जागी आणणे.
· चंद्रयान-२ हे यान देखील इस्रोने बनवले असून, ते २२ जुलै, २०१९ रोजी श्रीहरिकोटा अवकाशकेंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क-३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित करण्यात आले.
त्याच दिवशी मी संगणकावर 'थेट प्रक्षेपण' पाहताना, मला सुचलेल्या या ओळी:
(छायाचित्र: चंद्रयान
-२) |
अनंतापासून भेटण्या त्याला
तिची अनामिक ओढ होती,
कथा-कविता-चित्रांमधुनी
कुतूहलाची त्या जोड होती.
अमर्याद आहेत वाटेत मर्यादा
आहे जरी प्रचंड दूर आसमान हे,
'आई' चा 'बाळा'ला निरोप जणू
झेपावले 'भारत' मातेचे 'चंद्रयान' हे!!!
या चंद्रयान-२ यानामध्ये कक्षाभ्रमर
(Orbiter), लॅंडर ( Lander) व रोव्हर
(Rover) यांचा समावेश असून हे सगळे भाग भारतात विकसित करण्यात आले आहेत.
चंद्राच्या भूरचनेच्या, तिथल्या
खनिजांच्या व बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे हा चांद्रयान सोडण्यामागचा उद्देश होता.
चांद्र-मोहिमेच्या सर्वांत अवघड अशा
दोन गोष्टी, - पहिली म्हणजे पृथ्वीच्या
गुरुत्वाकर्षणाविरुद्ध कमाल वेगाने अवकाशात जाणे. आणि दुसरी म्हणजे चंद्राच्या
गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचल्यावर किमान वेगाने चंद्रावर उतरणे.
७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाण
वेळेनुसार १:५२ वाजता हे यान उतरत असताना चंद्रतलापासून अवघे
२,१०० मीटर उंचीवर होते, त्याच वेळी यानाशी
संपर्क तुटला आणि संपूर्ण भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला.
वाचक मित्रांनो, 'चांदोमामा पासून,
व्रत वैकल्ये, आणि फार तर मधुचंद्र' - या व्यतिरिक्त तुमचं चंद्राशी असलेलं नातं इथे नक्की लिहा…धन्यवाद!
संदर्भ: विकिपीडिया, इंटरनेट
लेखक: राकेश
शांतीलाल शेटे
विमानशास्त्र अभियंता, बेंगळुरू
संपर्क: 8951655367
Chanach Chan
ReplyDeleteखूप छान माहीती ���� आणि कविता ����
ReplyDeleteखूप छान माहीती
ReplyDelete