तू गेलीस, खुप काही मागं ठेवुन....आमच्यासाठी आणि पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी.
रोज पहाटे
"उठा उठा हो सकळीक" ह्या गोड भूपाळीने तू आम्हाला साखरझोपेतुन अलगद
उठवलस. तूच तर "आनंदी आनंद गडे" गात आमच्या बरोबर फेर धरलास. "गगन
सदन तेजोमय" गात आमचा हात धरून आमच्या कोवळ्या मनावर सुसंस्कार केलेस. “आओ तुम्हे चाँद पे ले जाऊं” च्या
सुरांबरोबर हलकेच एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेलीस.
"ने मजसी ने
परत मातृभूमीला" म्हणत देश ह्या संकल्पनेवर प्रेम करायला शिकवलंस. "ए
मेरे वतन के लोगों" म्हणुन ऊर अभिमानाने भरून येऊन डोळे कसे बरसतात हे जाणवुन
दिलस. पसायदानाच्या माध्यमातुन "वसुधैव कुटुम्बकम्" ही अभिव्यक्ती
आमच्या नकळत आम्हाला शिकवून गेलीस. "अल्लाह तेरो नाम" आळवत आम्हाला जाती
धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवलंस.
प्रेमातली हुरहूर, तरलता, विरह, रुसवे
फुगवे हे सगळं तुझी अगणित गाणी गुणगुणत तर अनुभवलं आम्ही. भक्ती, शक्ती, क्षमा, त्याग, अशा अनेक भावनांनी आमचं व्यक्तिमत्व घडवलंस. "एक प्यार का नगमा
है" म्हणत जीवनाचं सार तूच तर सांगुन गेलीस.
तू तुझ्या सुरांनी
कोट्यवधी भारतीयांचं जीवन समृद्ध केलंस आणि करतच राहशील आणि म्हणूनच आम्हा
सर्वांना तुझ्या ऋणातच राहायला आवडेल... कायमच. आज आम्हा सगळ्यांचा ...
"अखेरचा हा तुला दंडवत'
तुला दंडवत
तुला दंडवत"
मंजिरी एदलाबादकर
खुप छान झाला.... लताबाई.. विशैषांक
ReplyDelete