यावर्षी संक्रांतीनिमित्त मित्रमंडळाने
'आम्ही आणि आमचे बाप' हा अगदी आगळावेगळा कार्यक्रम १३
जानेवारी २०१९ रोजी सादर केला. पु.ल.देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या निवडक कलाकृतींवर
आधारित एक 'trip down the memory lane' असे या
कार्यक्रमाचे
थोडक्यात
वर्णन करता येईल. पु.ल. आणि
अत्रे यांना 'साहित्यिक' किंवा
'नाटककार' असे एकच
विशेषण लावता येणे
कठीण
आहे. साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, टीव्ही, पत्रकारिता अशा कितीतरी
क्षेत्रांत दोघांची कामगिरी अतिशय थोर आहे. त्यातच या वर्षी पु.लं.ची जन्म शताब्दी
असल्यामुळे त्यांच्यावर एक सिनेमा आणि इतरही खूप काही लिहून येत आहे. त्यामुळे कार्यक्रम
जाहीर झाल्यापासूनच त्याच्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
या कार्यक्रमात
मराठीतले चार प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार भाग घेणार होते. अतुल परचुरे,
आनंद इंगळे आणि पुष्कर श्रोत्री खूपशा नाटक,
सिनेमा आणि मालिकांमुळे सर्वांना परिचित आहेत. अजित परब
मराठी संगीत रसिकांत त्यांच्या गायन आणि संगीत दिग्दर्शनामुळे लोकप्रिय आहेत. त्यामुळे
हा कार्यक्रम जाहीर होताच
केवळ २-३ आठवड्यात 'हाऊसफुल्ल' झाला.
अजित परब
|
'व्यक्ती आणि वल्ली'तला 'नाथा कामत' |
जाफराबादचा जहागीरदार
|
'वाऱ्यावरची वरात' मधला म्हादबा
|
'तो मी नव्हेच ' मधला 'लखोबा लोखंडे'
|
अजित परब हे एक
मान्यवर संगीतकार आणि उत्तम गायक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भाई' या पु लं च्या आयुष्यावरील चित्रपटाला त्यांनी संगीत
दिलं आहे. त्यांनी पु.लं. आणि आचार्य अत्रेंनी
लिहिलेली आणि स्वरबद्ध
केलेली
काही निवडक गाणी सादर केली. सर्वच गाणी उत्तम म्हटली होती. त्यात विशेष उल्लेख करता
येईल 'उगवला चंद्र पुनवेचा', 'माझे जीवनगाणे' आणि 'इंद्रायणी काठी'
या गाण्यांचा.
याशिवाय या दोन्ही महान व्यक्तींच्या आयुष्यातले काही गंमतशीर तर काही त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे किस्से झाले. काही निवडक लेखनाचं वाचनही केले. अत्रे आणि पु.लं.नी समाज प्रबोधनाचं जे कार्य केलं त्याचीदेखील थोडक्यात माहिती दिली गेली.
Infosys
Foundation च्या अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध लेखिका
|
एकंदरीत कार्यक्रम सर्व प्रेक्षकांना खूप आवडला. अनेकांनी बाहेर जाताना दिलेल्या प्रतिक्रिया एकत्रित करून आम्ही त्याची एक छोटीशी 'व्हिडिओ क्लिप' बनवली आहे. ती बघण्यासाठी इथे क्लिक करा - Audience Feedback Video
(कार्यक्रमात घेतलेले फोटो मंडळाच्या फेसबुक page वरही पहाता येतील.)
मित्रमंडळ सर्व कलाकार, सहाय्यक, sponsors, मंडळाचे कार्यकर्ते, आणि प्रेक्षकांचे मनापासून आभारी आहे. यापुढील कार्यक्रम देखील असेच यशस्वी होतील, अशी आशा करूयात.
अनिल डेगवेकर
Uttam Adhava!
ReplyDelete