१५ ऑगस्ट १९४७ साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. जवळपास दीडशे वर्षे इंग्रजांनी
हिंदुस्थानावरती राज्य केले. इंग्रज आपल्या देशात व्यापार करण्याच्या हेतूने आले
होते. त्यांनी हिदुस्तानातील लोकांचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला.हिंदू
आणि मुस्लिम असे दोन मुख्य धर्म असणाऱ्या देशात,लोकांच्यामध्ये भांडणे लावून, मूठभर इंग्रजांनी राज्य करण्यास सुरुवात
केली. आपला व्यापार वाढवण्यासाठी दळणवळणाची साधने उपलब्ध केली. मोठमोठे पूल बांधले. इंग्रजांनी भारतात रेल्वे सुरू केली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक
लोकांनी आपले बलिदान दिले. आपला संसार सोडून देशकार्यासाठी स्वत:ला झोकून दिले.गांधीजींनी अहींसेचा मार्ग अंवलबिला,समविचारी लोकांना एकत्र आणले.अनेक
मोर्चे काढले,उपोषण केले आणि इंग्रजांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. इंग्रजांच्या विरोधात
कार्य करणाऱ्या लोकांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली, काहींना फासावरती लटकवले. पश्चिम
महाराष्ट्रात नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन करून, इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद
सेनेची स्थापना केली.
१५ ऑगस्ट १९४७ भारत इंग्रज राजवटीतून मुक्त झाला. २०२२ हे साल भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करणार आहोत. ७५ वर्षे हा फार मोठा काळ आहे. प्रत्येकानी आपल्या तीन पिढ्या जवळून पाहिल्या आहेत.
२६ जानेवारी १९५० या साली भारताच्या राज्यघटनेची स्थापना झाली. २६ जानेवारी हा दिवस भारतात
प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण देतात. इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना
स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती,ज्यामध्ये जहाल आणि मवाळ असे दोन प्रकारचे लोक होते. स्वातंत्र्योत्तर काळानंतर पंडित
जवाहरलाल नेहरू हे त्यांचे नेते होते. आणि ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्या
काळात आपला देश अतिशय गरीब होता. ‘गरिबी हटाओ’ चा नारा सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिला. त्या काळात भारताची
अर्थव्यवस्था छोटी होती. आज भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या नंबरची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली आणि सर्वानुमते
ती अमलात आणली गेली. ज्यामध्ये मागासवर्गीय लोकांना शिक्षणामध्ये आणि सरकारी
नोकरीमध्ये काही टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या. जो समाज स्वातंत्र्योत्तर काळात
मागासलेला होता तो आता सुशिक्षित झाला आहे. आर्थिकदृष्टया सुधारला आहे.
भारतातील राज्यांची स्थापना
बोली भाषेवर करण्यात आली आहे. उदाहरणार्थ मराठी बोलणारे लोक महाराष्ट्र राज्यामध्ये
समाविष्ट झाले, कन्नड बोलणारे लोक कर्नाटक राज्यात
समाविष्ट झाले. अशा त-हेने भारत देशात २९ राज्य आणि सात केंद्रशासित
प्रदेश आहेत. राज्याचा कारभार हा राज्य सरकार पाहते. विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत असते तो
पक्ष राज्याचा कारभार पाहात असतो. राज्यसरकारमध्ये मुख्यमंत्री आणि त्याने निवडलेले
मंत्रिमंडळ असतात. मोठ्या राज्यात अजून एक सभागृह असते आणि त्याला विधानपरिषद म्हटले
जाते. विधानपरिषदेतील सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले सदस्य ठरवतात. स्वातंत्र्योत्तर काळानंतर
सहकार क्षेत्र उदयास आले.
या क्षेत्रामधे राज्यातील बँका, जिल्ह्यातील बँका, साखर कारखाने, बाजारपेठा, गावातील सोसायटी, महिलांनी चालवलेले बचत गट असतात. सहकार चळवळीच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी विकसित झाला आहे. सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी यशवंतराव चव्हाण, शरद पवार या नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत. आज सहकार क्षेत्र धोक्यात असल्यासारखे मला वाटते. हे क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सरकारने लक्ष दिले पाहिजे. आपल्या देशातील शेतकरी हा अतिशय कष्टाळू आहे. त्याने केलेल्या कामाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे. त्यांच्या उत्पन्नाला हमीभाव मिळाला गेला पाहिजे. त्यांच्या मुलांना शिक्षणात, नोकरीमधे संधी मिळवून दिल्या गेल्या पाहिजेत. शेतकरी सुशिक्षित होणे ही काळाची गरज आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ज्ञान मिळविणे आजची गरज आहे. आज भारतातील ६०% लोक खेडेगावात राहतात आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेती व्यवसाय हा अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत करत असतो, शेतीच्या मालाची गुणवत्ता वाढवली तर आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनाला मागणी मिळेल आणि त्याचे उत्पन्न वाढेल. शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी सरकारने राज्याच्या आणि देशाच्या अर्थसंकल्पामध्ये भरघोस सोय करून ठेवली पाहिजे. पानी फाऊंडेशन, जलयुक्त शिवार यांच्यामार्फत आज ब-याच खेडेगावांत पावसाचे पाणी साठवण्याचे काम चालू आहे. त्यांचे काम अतिशय कौतुकास्पद आहे.
भारतीय बाजारपेठ सर्व
जगासाठी खुली केल्यानंतर, अनेक नवीन उद्योगधंदे आपल्या देशामधे सुरू झाले. बाहेरील देशातील कंपनीना
उद्योगधंदे करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले गेले. परदेशी कंपन्या प्रचंड
प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. ह्यामुळे देशामध्ये रोजगार निर्मिती झाली. अनेक
सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार मिळाले. खेडेगावातील मुले शहराकडे जाऊ लागली.
महाराष्ट्रसारख्या राज्यात MIDC झोन प्रत्येक तालुक्यामधे सुरू केला गेला. खेडेगावातील मुलांना
त्यांच्या घराच्या जवळ नोकरी मिळू लागली आहे. नोकरीसाठी त्यांना
मुंबई,पुण्यासारख्या शहरात जाण्याची गरज लागत नाही. शेती सांभाळत ते आपली नोकरी करत
असतात. अलीकडच्या काळात
औद्योगिकीकरणामुळे, शहरीकरणामुळे, वाढत्या दळणवळणामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. एकेकाळी बंगलोरसारखे शहर गार्डन सिटी म्हणून
ओळखले जायचे. आज तशी परिस्थिती राहिली नाही. ह्या मुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ह्या सर्वांचा परिणाम लोकांच्या राहणीमानात झाला
आहे. लोकांचे आयुष्य कमी झाले आहे.
प्रत्येक मेट्रो शहरात
दळणवळणासाठी मेट्रो सुरू झाली आहे, काही शहरांमधून मेट्रोची कामे
चालू आहेत. चार पदरी नॅशनल हायवे आता सहा पदरी आणि काही ठिकाणी आठ पदरी झाले आहेत. एकूणच काय तर देश
एकविसाव्या किंव़ा अमृत महोत्सवाच्या उंबरठयावर वेगाने प्रगती करताना दिसत आहे. आज आपल्या
देशाची अर्थव्यवस्था $२ ट्रिलीयन आहे, आताच सरकारने २०२२ म्हणजे देशाच्या अमृत महोत्सवी
वर्षात ती $५ ट्रिलियन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अतिशय मनापासून प्रयत्न चालू आहेत.
आपल्या देशाला पाकिस्तान,चीन,नेपाळ आणि बांगलादेश या देशाच्या सीमा
लागून आहेत. भारत, पाकिस्तान फाळणीनंतर काश्मीर प्रश्न निर्माण झाला. पाकिस्तानने नेहमीच
आम्हाला काश्मीर हवा आहे हा डंका पिटला आहे. आजपर्यंत लाखो लोकांना बलिदान द्यावे
लागले आहे. ह्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तानमधे चार युद्धं झाली आहेत. भारत नेहमीच विजयी झाला आहे. तरीही पाकिस्तानने
काश्मीरचा काही भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. भारत आणि चीन याच्यामधे सीमावादावरून युद्ध झाले आहे. भारत, पाकिस्तान आणि चीन हा सीमावाद नेहमीच
आतंरराष्ट्रीय फोरममधे चर्चेचा विषय बनला आहे. अमृत महोत्सवाच्या उंबरठयावर हा सीमावाद मार्गी लागला पाहिजे
हे प्रत्येक भारतीयाचे प्रामाणिक मत आहे. भारताची मिलिटरी ताकद ही जगामधे चार नंबरची आहे. आज भारताकडे
लांब पल्ल्याची क्षेपणास्रे आहेत. क्षेपणास्रे घडवण्यात डॉ. अब्दुल कलाम यांचे
योगदान मोलाचे आहे. त्यांना भारतात मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही
काळ भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. अशा महान व्यक्तीला माझे विनम्र अभिवादन.
आज इस्त्रोनी अंतराळात सोडलेले उपग्रह अंतराळात फिरत आहेत. भारताने सन २०१९ पर्यंत ११६ उपग्रह अवकाशात सोडले आहेत. सन १९९९ पर्यंत अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या कमी होत्या. ज्या वेळेस राजीव गांधी यांनी भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली केला तेव्हा जगातील अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी आपली शाखा सुरू केली. लोकांना संगणकाचे ज्ञान अवगत करण्यास सुरुवात केली. सीडॅकसारख्या शाखेने भारतात पहिला संगणक बनिवला. लोकांना संगणकाचे ज्ञान देणारी शाखा सुरू केली. आज आपल्या देशात लाखो अभियंते अभियांत्रिकी क्षेत्रात काम करत आहेत. टाटा कन्सलटिंग, इन्फोसिस, विप्रो यासारख्या कंपन्यांनी आपल्या कामानी आपले नाव जगाच्या अभियांत्रिकी क्षेत्रात निर्माण केले आहे. आज लाखो अभियंते या कंपन्यांतून काम करत आहेत. नारायण मूर्ती यांना भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील पितामह म्हणून ओळखले जाते. एका प्लॉटमधे नारायण मूर्ती यांनी सहा अभियांत्यांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या कंपनीत जगाच्या विविध भागांत लाखो अभियंते काम करत आहेत. आज हजारो अभियांत्रिकी कंपन्या भारताच्या विविध भागांत काम करत आहेत. आज अमृत महोत्सवाच्या उबंरठयावर प्रत्येक क्षेत्र ऑनलाइन झाले आहे, संगणकाशी जोडले गेले आहे. प्रत्येक क्षेत्रात ऑटोमेशन झाले आहे. २०१९ मध्ये काम करणाऱ्याना सरकारने कॅशलेश व्यवहारांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली होती. प्रत्येक शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी विशेष सुविधा दिल्या जात आहेत. सर्व खेडेगावांत स्वच्छतागृह बांधण्यासाठी गरीब लोकांना विशेष मदत केली जात आहे. गरीब लोकांना घरगुती गॅस पुरवठा आणि वीज मोफत दिली जात आहे.
आज आपण आपल्या देशाच्या अमृत महोत्सवाच्या उबंरठयावर असताना सर्वधर्म समभाव, एकमेकांना साहाय्य करू इत्यादी गोष्टीचा संकल्प करूयात
जेणेकरून आपला देश जवळच्या काळात जगातील महासत्ता म्हणून ओळखला जाईल.
अभ्यासपूर्ण व समाजाच्या सर्व अंगाने विचार करणारा लेख.मुद्देसूद मांडणी
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!!
Deleteतुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteप्रेरणादायी आणि राष्ट्रअभिमान जागृत करणारा लेख आहे. आपले अभिनंदन
ReplyDeleteतुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो....
Deleteगणेश लेख छान आहे.१९४७सालापासून ते आज पर्यंत च्या कालावधी चा सिंहावलोकन करण्यात आले आहे. वाचताना छान वाटले.सीडॅकसारख्या शाखेने भारतात पहिला संगणक बनिवला.वरील वाक्य जरा अपूर्ण वाटते. माझ्या माहिती प्रमाणे अमेरिकेने महा संगणक Super Computer भारताला देण्याचे नाकारल्यामुळे भारताने भारतात परम हा महा संगणक Super Computer भारतात स्वतः च्या हिंमतीवर बनवला असे हवे होते.तसेच मागील आढावा घेताना भविष्याचा थोडा वेध घेतला असता तर आणखी जरा बरे वाटले असते. असो पण लेख आवडला.कम्प्युटर चे क्षेत्रात च किती तरी बदल घडत आहेत,त्याचा एकदा वेध घे ना.Open source companies are going to threat Microsoft ,so Microsoft is now using open source this is dramatic change in the policy of Microsoft.I think there will be no monopoly in operating systems of MS office in nearest future because Google Crome is in market with its G suite .Now it is available on any desktop.It is a future.
ReplyDeleteYours
Dilawar Shaikh
दिलावर, तु अतिशय छान आणि मनापासून अभिप्राय दिला आहेस. तुला मनापासून धन्यवाद देतो....
Deleteखूपच छान लेख, स्वातंत्र्यपूर्व भारतच्या परिसि्थीतीचे केलेले वर्णन व स्वातंत्र्यानंतरच्या भारततील झालेल्या बदलांचे वर्णन मार्मीक पण विशलेषणत्मक केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पासून ते डॉ. अब्दूल कलाम यांच्या योगदानाचा यामध्ये उल्लेखाने लेखाची नक्कीच वेगळ्या उंचीवर जातो. भारताचा विकासातील शेतकरी हा महत्वाचा घटक याच उल्लेख करून शेतीप्रधान भारतात शेतकरी किती महत्वाचा आहे याची जाणीव होती. देश एकसंघ व संघटीत राहण्यासाठी केलेला संकल्प नक्कीच प्रेरणादायी आहे. असेच लिहित जा. आपला हितचिंतक
ReplyDeleteभारताचा विकासातील शेतकरी हा महत्वाचा घटक याचा उल्लेख करून शेतीप्रधान भारतात शेतकरी किती महत्वाचा आहे याची जाणीव होती. कंप्युटर क्षेत्रात किती बदल घडला आहे त्याचा वेध घेणारा लेख आहे सर्वधर्म समभाव जोपासण्यासाठी प्रोत्साहन देणारा लेख आहे एकंदर सर्वच लिखाण छान आहे. वाचून छान वाटलं
ReplyDeleteअमोल संकपाळ
सकाळ मीडिया ग्रुप पुणे.