"कस्तोरबहीन..... पणत्या लेन्याशेतना ?...... कां लेवाई ग्यात ?" असं म्हणत तिनेही
ओट्यावर बसकण मारली.
पानी पाजवं बहीन.... जीव लहा लहा करी -हायना." असं म्हणत तिनं पदराने घाम पुसला व ती पदरानेच हवा घेवू लागली. आईने पाण्यासाठी घरात आरोळी दिली तसा मी ग्लास व तांब्या घेवून उत्कर्षाला बाहेर पाठवलं. सोनआजी पाणी पिऊन तृप्त झाली. आईने पणत्या, बोळके घेतले. चार हात आणि पाच दिवे असलेली दिवाळीची मूर्ती घेतली. झिकझिक करुन पैश्यांचा व्यवहार झाला.
आईच्या या बोलण्याने मी आवाक झालो. माझं विचारचक्र फिरु लागलं. कुंभार म्हणजे निर्मिकच. साऱ्या सृष्टीची निर्मिती करणारा कुणाला दिसत नाही. मात्र, मातीतून नानाविध वस्तू घडवणारा कुंभारही त्याच तोडीचा नाही कां? तो फक्त घडवण्याचा अधिकारी. त्या वस्तूंचं भाग्यही शेवटी तो नियंताच ठरवतो. "अरे, कुंभार जरी एकसारखा मडका घडावत व्हईन तरी तेन्ह नशिब मात्र तेल्हे घडता येत नही." या तिच्या खुलाश्याने मी नतमस्तक झालो. मला मात्र क्षणात
सांभाळशी तू, तूच मोडशी
मुखी कुणाच्या पडते लोणी,
कुणा मुखी अंगार
विठ्ठला तू वेडा कुंभार - हे गीत आठवले.
"मी लयसू बरबर.... तू कायजी नको करु." म्हणत ती बाजारात गेली. थोड्या वेळाने ती परत आली पणत्या, बोळके आणि दिवाळीची मूर्ती घेवून. तिनं तो सारा ऐवज पिशवीतून काढून आई समोर मांडला. तिच्या चेह-यावर आनंद होतात्या खरेदीचा. इतर सर्वजण जवळ येऊन बसले. आईने हातचं काम संपवलं आणि तीही बसली.
आई म्हणजे शिस्तीची भोक्ती. टाप-टिप, पूजेचे निती-नियम पाळणारी. व्यवहारीही. पै पै चा काटकसरीनं वापर करणारी आणि हिशोब ठेवणारी. योग्य ठिकाणी उदार होवून आनंदाने खर्च करणारी. आईला ती मूर्ती पटली नाही. तिनं ताईला मूर्ती परत करुन दुसरी आणायला सांगितलं. नसेल परत देत तर पैसे परत आण म्हणून बजवलं.
"आई, आता कुठे असेल ग तो विकणारा... बाजार उठला असेल आता." असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा ताईनं प्रयत्न केला. परंतू मात्रा काही लागू पडली नाही. आईनं तिला उठवलं आणि मूर्तीसह बाजारात पिटाडलं.
तडा गेलेली ती दीपावलीची मूर्ती हातात घेवून ती पुन्हा बाजारात गेली. तिथले बहुतेक सर्वच विक्रेते माल विकून निघून गेले होते. आता ताईच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. तिला चक्क रडूच कोसळलं. बाजार, किराणा आणणं ही कामं तीच करायची. आई आणि ताईच ते सांभाळून घेत. ताई तर मला काही कामच करु देत नसे. मी अमळनेरला शिकतो याचं तिलाही खूप अप्रूप वाटायचं. मी आणि लहान कल्पनाताई शिकलो ते तिच्या मदतीमुळेच. आमच्यामुळे तिलाच जास्त काम करावं लागायचं. मात्र ती चकार शब्दाने बोलली नाही. ती रडतच घरी आली.
"बहीन काई बोलशी का? काय मुंग
मुगी उभी राहिनी..... बोलनं काय झायं ते?"
"माडी, तो इकनार काई नही व्हथा
तठे... तेन्हा माल ईकाई ग्या व्हईन. मग कशी काय बदलाई भेटीन मूर्ती?" आईचा राग अनावर झाला.
ती म्हणाली "बठ्ठा बजार धुंड ... मोठा बजार म्हा जाय, तठे जातस दुपारले आथाना बठ्ठा मालवाला.” आईची शिस्त सर्वांना माहित होती. तिला नियमाने सारे आवडायचे. तिनं ताईला मोठ्या बाजारात पाठवलं. तिची घालमेल पाहून मी म्हणालो "माडी, मी जाऊ का ताईसोबत? दोन्ही मीसन धुंडसूत तेले. आनी बदलाई लयतस मूर्ती." माझ्या या पुढाकाराने ताईला हुरुप आला. आईने होकार दिला. मी तिच्यासोबत चालू लागलो.
"घाई घाईम्हा देखं नही नीट...... तेन्ही बी पंधरानी
मूर्ती दहामा दिन्ही तव्हयच समजाले जोयजे व्हतं माले." ती
म्हणाली. आम्ही बाजारात पोहचलो. इथंही खूप शोधाशोध केली. मात्र मूर्तीवाला भेटलाच
नाही. आम्ही दोघं हताश झालो. मी म्हणालो "ताई, आते काय व्हईन....... मायतं रागे भरीनच पण तिले पैसा वाया गयात यानं जास्त
दुःख व्हईन."
"खरंशे तू म्हनस ते.... आते सर्वा इलाज खुटनात."
मी जवळच्या इमारतीच्या पायरीवर जुगारात हरल्यासारखा बसलो. ताईही माझ्याजवळ
बसली. मी म्हणालो...."ताई, एक मार्ग शे."
"काय? सांग नं नाना काय करता येइन
?"
"हाई देख... आपून हाई मुर्ती त्या समोरनां पिप्पयना
झाडखाले जे छोटं मंदिर शे नां तठे ठी द्यूत. आनी घर निंघी जाऊत."
"घर मायले काय सांगानं?"
"मायले सांगसूत की मूर्तीवाला भेटना... तेन्ह्या
रावन्या पावन्या क-यात तव्हय तेनी मूर्ती वापस लिसन पैसा परत दिन्हात."
"नानाsssमूर्ती वापस गई ते खरं शे
पन पैसास्न काय करानं?"
तिच्या या प्रश्नावर मी पँटच्या खिश्यातून दहा रुपये काढले आणि तिच्या
हातावर ठेवत तिला म्हणालो... "ह्या पैसा दे तू
मायले... मूर्तीवालानी परत दिन्हात असं सांगसूत."
"अरे पन ह्या तुले कालेजना लागटेबल का काय ते लेवाले
देयेल शेतना मायनी?"
"हा, हा मी देखीलेसू तठे... करसू
मित्रसफाईन उधारी."
ती म्हणाली " नाना, मायथून खोटं बोलानं???"
मी म्हणालो "खोटतं बोली
राहीनूत. पन, आपले चोरी चपाटी थोडीच करनी शे ... जे झायं ते
व्हई गयं. आते हातमां काय शे ?... मूर्ती घर लईगवूत तं माय
मनले खाईन... पैसा पानीम्हा गयात असं तिल्हे वाटीन ... मूर्ती देखी तिन्हाजीव
बयीन. तुनावर सर्वा राग धरतीन."
Sylvester's_Eye_Sumit_Deshpande |
Boidsky |
प्रा. बी. एन. चौधरी
किती सुंदर लिहिलंय... वाचताना शेवटी डोळ्यात पाणी आल.
ReplyDeleteखूपच सुन्दर कथा.मनाला भिडणारी!
ReplyDeleteआपल्या मनभावन अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
ReplyDeleteमी संपादक मंडळाचेही आभार मानतो.
त्यांनी माझ्या या कथेला (जी माझीच सत्यकथा आहे) समर्पक चित्र जोडून तिला वाचकांच्या थेट मनापर्यत पोहचवण्याचे काम केले आहे. संपादकाची ही कलात्मक दृष्टीच लेखकाच्या लिखाण आकर्षक आणि भावनीक करत असते. धन्यवाद !
रम्य ते बालपण एक अतिशय सुंदर कलाकृती. प्रत्येकाच्या मनावर अशा काही काळजाला भिडणाऱ्या आठवणी कोरलेल्या असतात. तुम्ही खूप छान तुमच्या आठवणींना शब्दरूप दिला आहे .
ReplyDelete