Being Sensitive

सीन १:----
शिल्पा,अगं जरा अजून भजी आण ना. मस्त झाली आहेत. काय रे मध्या? समीर म्हणाला.
हो वहिनी,मस्तच झाली आहेत भजी. तुम्ही बिझनेस सुरु करा केटरींगचा! मधुकरने दुजोरा दिला.
मध्या,over acting बास हं. जा गं,पटकन आण. शेवटच्या पाच ओव्हर्स बाकी आहेत. शर्मा आणि पोलार्ड धुणार आहेत गलोरला. -समीर
मी काय म्हणते मधू,RCB विरूद्ध निदान १८० हवा ना स्कोर? पाच ओव्हर्समधे ६० रन्स होतील का आपले? शिल्पा आत जाताना थांबून म्हणाली.

तू कशाला माहीत नसलेल्या गोष्टीत ज्ञान दाखवतेस? भजी तळ ना बाई.- समीरने नेहमीप्रमाणे तिची खिल्ली उडवली.

काय रे समीर? मिथिलच्या डिव्होर्सची तयारी करतोयस वाटतं? - मधुकरने गंभीरपणे विचारले.
काय रे? येताना घेऊन आलास का थोडीशी? तो फक्त दहा वर्षांचा आहे. समीर त्यालाही उडवून लावण्याच्या सुरात म्हणाला,
पण तो तुला फॉलो करतो. आणि वहिनीशी तस्साच बोलतो. तुझं ठीक आहे रे! आपल्या जनरेशनला,असे उठता-बसता होणारे 'मिनी-अपमान' हसून पचवणाऱ्या मुली मिळाल्यायत. पुढची जनरेशन हे ऐकून घेणार नाही.
So be careful. Either change your attitude,or be prepared for a bad marriage of your son. You are sowing the seeds for it.

समीरचं IPLवरुन लक्ष केव्हाच उडालेलं होतं. मध्याने सिक्स मारली होती.

सीन:----
मी काय म्हणते,आपलं कर्वे उद्यान आहे ना? मी मॉर्निंग वॉकला जाते ते? तिथे चालण्याची मॅरेथॉन आहे woman's day ला. माझ्या मैत्रिणी म्हणाल्या. 'निशा, तू चांगली फिट आहेस. फास्ट चालतेस. जिंकशील.',जाऊ मी?
नसतं काहीतरी. तू फक्त फिरायला जातेस ते खूप आहे. उद्या पाय,कंबर दुखवून घेतलेस तर त्या तुझ्या आगाऊ मैत्रिणी येणारेत बघायला तुला? श्रीकांतने तिचं बोलणं उडवून लावलं, नेहमीसारखं.
मम्मा, हे बघ. मला बॅडमिंटन टूर्नामेंटमधे पहिलं बक्षीस मिळालं. तेवढ्यात कीर्ती धावतच घरात शिरली.
हं. - निशा पटकन काही बोलूच करू शकली नाही. इतकी दुखावली होती ती.
व्हॉट्स राँग विथ यू आई? - कीर्ती निशाकडे रागाने बघत श्रीकांतकडे गेली.
बाबा,हे बघ
एक्सलंट राणू. माझी पी.व्ही. सिंधु आहे ती. We must celebrate this. काय गं निशा?
कशाला उगाच तिला प्रोत्साहन देताय? उद्या तिचंही लग्न होणार. फार सवय नका लावू तिला स्वप्नांची. तिलाच त्रास होईल नंतर.
श्रीकांत किचनमधे आला.
आय अॅम सॉरी निशा. मी येईन तुझ्याबरोबर मॅरेथॉनला. आपण दोघे मिळून ही मॅरेथॉन जिंकू.

मानस

2 comments:

  1. नेहमी प्रमाणे- साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे ...

    ReplyDelete
  2. Being sensitive is really very touchy. Let's find out are we hurting anyone directly or indirectly.

    ReplyDelete