श्री भगवान उवाच - खेळानाम् क्रिकेटोस्मि


जरासा आळसावूनच कृष्ण झोपायला गेला. नुकत्याच भरत खंडातल्या निवडणूका संपल्या होत्या. ती रणधुमाळी महाभारतातल्या युदधापेक्षाही जास्त थकवणारी होती. दूरूनच पाहीलं तरीही कृष्ण 'exhaust' झाला होता. खूप वेळाने त्याला जाग आली. पहातो तर काय ?
भरत खंडाचा क्रिकेट संघ त्याच्या पायाशी! चेंडूफळी हा त्याचाही आवडीचा खेळ! यमुनेच्या काठावर आपल्या सवंगड्यांसह तो अनेकवेळा खेळला होता. त्याला कालियाची आठवण झाली, spoil sport कुठचाविराट, रोहीत, बुमराह ह्यांना त्याने सहज ओळखलं.
आपल्या उशाला कुणी बसलंय  की काय? त्याने वळून पाहिलं, उशापाशी कुणीही नव्हतं.
वत्सा बोल, तुला काय हवं आहे?’ त्याने विराटला विचारले.
विजयश्रीविराट आदरपूर्वक नमस्कार करून म्हणाला.
आता विश्वचषक स्पर्धा येते आहे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हवा’, रोहीत म्हणाला.
बुमराहने त्याची 'री' ओढली.
कृष्ण समजून चुकला, ह्यांनी दूरदर्शनवरचा महाभारतातला तो episode पाहिलेलाच नाही. ज्यात पांडव कृष्णाच्या पायाशी व कौरव उशाशी बसले होते.
पर्याय दोनच! एकतर टीममध्ये कृष्ण नाहीतर त्याचं सैन्य. कृष्णाला टीम मधे घेतला नी विजयश्री पांडवांची झाली!
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थ धनुर्धर।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।
विराटने टीम मधे येअसं म्हटलंच नव्हतं. सर्वव्यापी कृष्णाला भवितव्य कळून चुकलं, तरीही तो थोडासा द्रवलाच! नाही म्हटलं तरी हे सर्व त्याचे भक्त होते. लहानपणी आई वडिलांचं बोट धरून दर्शनाला आले होते. आणि आज ही आठवणीने भेटायला आले होतेअर्जुनाला जे सांगितलं तेच त्याने विराटलाही सांगितलं. जे सांगणे गरजेचंही होतं!
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुभू्र्मा ते सडं्गोस्त्वकर्मणि।।
फळाची अपेक्षा न करता क्रिकेट खेळत रहा.
पण त्या वेळीही प्रॅक्टिस ला गेल्यामुळे विराटचा महाभारतचा तो episode ही बघायचा राहून गेला, ज्यात अर्जुनाला गीता सांगितली होतीइंग्लंडमध्ये वेगवेगळ्या भागांत क्रिकेटचे सामने सुरू झाले.
जिथे जिथे भारतीय संघ खेळत होता तिथे तिथे कृष्णाला जाणे भाग होते. त्यात English weather बेभरवशाचे!  केव्हा पाऊस येईल आणि सामना वाहून नेईल सांगतां येत नव्हते. कृष्णाला स्वत:च्याच एका कृत्याची आठवण झाली आणि हसू आले. सुदर्शन चक्र सूर्यासमोर धरून त्याने सूर्यालाच झाकून टाकले होते आणि चक्र बाजूला करून, अर्जुनाला म्हणाला होता, ,’हा सूर्य नी हा जयद्रथ!’
कृष्णाचं लक्ष commentators box कडे गेले. संजय मांजरेकरचं सर्व लक्ष फोनमध्ये! त्याचं आपलं फोन वरून twitter वर संजय उवाचचालू.
नियतं कुरू कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण:’
दूसरंच काहीतरी करण्यापेक्षा सांगितलेलं काम नीट करावं,’ कृष्णाच्या मनांत आलेरोहीत फॉर्मात दिसत होता. त्त्याला मनसोक्त खेळू द्यायचं, शतकं काढू द्यायची, record बनवू द्यायचं. तो क्रिकेट धर्माला जागतो आहे. बुमराह चा खेळही कृष्णाला आवडला. त्याने भरपूर मेहनत घेतली होती. खेळ रे बेटा, मजा कर, भरपूर विकेट घे.
द.आफ्रिका, स्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्टइंडीज, बांगला देश, श्रीलंका - भारत एकापाठोपाठ एक सामने जिंकत गेला. मधेच इंग्लंड बरोबर हरूनही तो जिंकल्यातच जमा होता.
विराट खूष होत होता. बलाढ्य नि अजिंक्य अशा भरतखंडाच्या टीमचा तो कप्तान होता. भारत भूमीचे सारे लोक त्यांच्या पाठीशी होते.
‘India India India India’
उपांत्य फेरीत गाठ न्यूझीलंडशी. भारताला मोठा झटका! भारत सामन्यांमधून बाद!
विराटने कृष्णाकडे पाहिलं, त्याच्या नजरेत अनेक प्रश्न होते. कृष्णाने खूणेनेच सांगितलं,'तू मला टीममधे घेतलं नाहीस'. विराट गोंधळात पडला. कृष्ण मिश्किल हसून म्हणाला, 'वत्सा YouTube वर महाभारताचे सर्व episodes मिळतील,जरा गुगल कर’.


 नेहा भदे


1 comment:

  1. Super रुपा. मस्तच लिहिलंय

    ReplyDelete