मित्र ते मैत्र....


मित्र ते मैत्र....
तीळ अन् गुळाची साथ,
एकमेकांत मिसळून
वाढविती गोडव्याचा स्वाद.
सदैव  आपले हातात हात
अन् कडू तत्वावर मात,
ना करत 'श्रेष्ठ  कोण' ची स्पर्धा
एकमेकांसाठी  जीव होई अर्धा.
एकात असे मजबूती देणारं लोह
तर दुसरा असे स्नेहमयी स्निग्ध,
खाणारा मात्र  दोहोंवर लुब्ध
जिव्हा तर केवळ  मुग्ध!
तीळ अन् गुळाची साथ,
प्रतिक स्नेहाचे अन् भाव मैत्रीचा
स्थिरावती पोटात पण
शुभारंभ  मनांत - मित्र ते मैत्रचा.....!!
स्मिता  शेखर  कोरडे

1 comment:

  1. खूप छान, अगदी माझ्या मनातलंच, लिहिलंय्....

    ReplyDelete