एक प्रेरणादायी प्रयोग


आपलं घर, मुलं' नातेवाईक, स्वयंपाक हे सगळं सांभाळून करिअर करता आलं तरी खूप! बंगलोरच्या ट्राफिक मधून रोज कामावर जाऊन परत येतानाच अगदी हुश्श होतं तर त्यानंतर छंद सांभाळणे किंवा समाजसेवा करणे म्हणजे जणु स्वप्नातल्या गोष्टी! 
त्यामुळे आपल्याच सारख्या काही मैत्रिणी जेव्हा हे सगळं सांभाळून वेगळं काहीतरी करून दाखवतात तेव्हा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्कीच मारावीशी वाटते.  नेहा सारडा या दंतवैद्य मैत्रिणीनं काही वर्षांपूर्वी आपलं स्वतःचं SmileOn Dental Clinic सुरु केलं. सगळ्यांनाच कुटुंब आणि लहान मुलांची जबाबदारी! त्यामुळे आपल्या मित्र-मैत्रिणींची मदत घेत आणि करत या डॉ. नेहा चावला , डॉ. नकुल राठी  डॉ. नेहा सारडा  आपलं क्लिनिक सांभाळत असतातपण हे सांभाळताना या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपल्या ज्ञानाचा समाजासाठी वापर करावा असं यांच्या मनात आलं आणि त्यांनी ते प्रत्यक्षात घडवूनही आणलं

Inner Wheel Club  of Bangalore IT corridor या संस्थेच्या मदतीनं त्यांनी cavity free government school ही योजना बंगलोर मधल्या सात गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये सुरू केलीबंगळूर शहरात राहात असले तरीही अगदी प्राथमिक सोयी सुविधा आणि वैद्यकीय व्यवस्था परवडू शकणारी अनेक कुटुंब आपल्याला आजूबाजूला दिसतातगव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये जाणाऱ्या त्यांच्या मुलांना मूळ सुविधा, दोन वेळ पोटभर जेवण, स्वच्छता आणि आरोग्य यांची माहितीही नसते त्यामुळे दातांचे आरोग्य ही तर फार पुढची गोष्ट. मुळात दातांचे आरोग्य आणि स्वच्छता सांभाळून कित्येक आजार दूर ठेवता येतात याची मुलांनाच काय पण पालकांनाही कल्पना नसतेही परिस्थिती लक्षात घेऊन या तिघी  दंतवैद्यांनी या शाळांमध्ये आपले काम सुरू केले


शाळेत जाऊन मुलांच्या दातांचे आरोग्य तपासणे, दात घासणे चुळा भरणे आणि इतर आरोग्यदायी सवयींची त्यांना माहिती देणे हा या कामाचा पहिला टप्पा



या पहिल्या टप्प्यातच या सर्वांच्या लक्षात आलं की वाटतं त्यापेक्षा या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर ब्रुकफिल्ड एरियात असलेलं Thubarahalli government school.  
या शाळेत प्राथमिक इयत्तांमध्ये असलेल्या सुमारे १३५ मुलांच्या दातांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की त्यातल्या जवळजवळ ८० मुलांना पुढील ट्रिटमेंटची आवश्यकता आहे आणि या ट्रीटमेंटसाठी या सर्व मुलांना क्लिनिकमध्ये घेऊन येणं आवश्यक होतं. पुन्हा एकदा इनरव्हिल सर्कल मदतीला आलंयोजनाबद्ध पद्धतीने वेळा ठरवून दररोज काही मुलांना क्लिनिकमध्ये आणण्याची परत नेण्याची व्यवस्था इनरव्हील क्लबने केली. या सर्व मुलांवर  या तिनही डॉक्टरांनी मिळून पूर्णपणे मोफत उपचार केले. जवळजवळ पाच महिने चालू असलेल्या या प्रयोगात या मुलांवर scaling, cavity filling, root canal असे उपचार गरजेनुसार करण्यात आले. कामाचा अवाका पाहुन  या कामात या तिनही डॉक्टरांना त्यांचे अजुन दोन सहकारी   डॉ. प्रीति वाकोडे   डॉ. रिशिका ताओरी यांनी ही मोलाची मदत केली


या सोबतच दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे शिकवणारी  वर्कशॉप्स घेण्यात आलीशेवटच्या दिवशी दातांच्या आरोग्याच्या काळजीची माहिती देणारं, मुलांना रुचेल पचेल आवडेल असं कार्टून स्वरूपातल छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध करून सर्व मुलांना देण्यात आलं


Tubharahalli Public School मध्ये यशस्वी रित्या करण्यात आलेला हा प्रयोग अनेक शाळांमध्ये असाच करत राहण्याची या सर्व डॉक्टरांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी इतर समाजसेवी संस्थांना मदतीसाठी आवाहनही केले आहे. त्याला प्रतिसाद मिळून त्यांचा हा उपक्रम असाच उत्तरोत्तर अधिक यशस्वी होवो हीच शुभेच्छा.


आपल्यासारख्या अनेक जणांसाठी आपल्या जवळ असणारी कौशल्य वापरून समाजाला कशी मदत करता येऊ शकते याचं हे जिवंत उदाहरणच आहे. त्यामुळे अशा उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन प्रत्येक जण आपापल्या परीने असं काहीतरी करेल त्या दिवशी देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी  सुटु शकतील


        गंधाली सेवक


1 comment: