शब्द सुरांच्या जगात

गझल - मूळ उर्दू - फारसीतून आलेला काव्यप्रकार... आता मराठीतही चांगलाच रुळलेला. कुठल्याही भाषेतल्या साहित्याला त्या त्या मातीचा वास असतो, स्वत:ची अशी एक जादू असते, त्या संस्कृतीचं म्हणून एक वलय असतं. स्वत:चं असं एक अंगभूत सौन्दर्य आणि प्रभाव असतो. मूळचा परक्या भाषेतला गझल हा काव्यप्रकार असाच आहे. इतका सुंदर आहे की त्याची मोहिनी इतरही भाषांवर पडलेली दिसून येते. मराठीनेही या गझलला आता अगदी आपलंसं करून घेतलं आहे. तिच्या रचनेतल्या तांत्रिक गोष्टींबरोबरच तिच्या सादरीकरणाचेही काही प्रवाह आहेतगझलच्या "गायकी"च्या समृद्धतेचा आस्वाद उर्दू इतकाच आपण मराठीतूनही घेतला आहे.

गझलचा समग्र इतिहास आणि गायकीची पद्धत हा या लेखाचा हेतू नाही. पण तरीही संगीतकार म्हणून काही विचार मांडावेसे वाटतातगझल गायली जाते तशीच "गझल कहना" ही एक परंपरा आहे. कारण यात खरोखर अगदी दोन ओळींच्या शेरात एक पूर्ण गोष्ट  सांगितली जातेमुळात इतर कविता आणि गझल यात फरक हाच आहे की संपूर्ण कविता/गीत ही एका विषयाला धरून लिहिली जाते आणि गझलचं वैशिष्ट्य हे, की केवळ दोन ओळींच्या शेरात एक संपूर्ण विषय पर्यायाने एक संपूर्ण कविता सामावली जाऊ शकतेत्यामुळे एखाद्या गझलेत / शेर असतील तर ते एकाच विषयावरचेही असू शकतात (मुसलसल) किंवा तसे नसूही शकतात(गैरमुसलसल). आपल्या कविता जशा वृत्त, छंद यात रचल्या जातात तशा गझलेच्या बहर असतात. ओळीची लांबी, लघु गुरु तंत्र सांभाळून  केलेल्या या रचनांचे ढोबळपणे छोटी, मध्यम आणि लंबी बहर असे प्रकार पडतात.

गझल हे वृत्त असलं तरी मुख्यतः ती वृत्ती आहे असंही म्हटलं जातं. अशीच अनेक भाववृत्ती व्यक्त करणारी ही एक गैरमुसलसल गझल वाचनात आली... "भटांनंतरची गझल" या संग्रहात. डॉ. ज्ञानेश पाटील यांची ही एक लंबी बहर रचना आहे. यात लांब लांब ओळी असतात. अर्थातच एकेक ओळ गातांना साधारणपणे मध्यावर किंवा अर्थपूर्ण ठिकाणी तोडून रिपीट केली तरी  रसहानी होता गायकी अंगाची, श्रवणीय रचना नक्कीच होऊ शकतेपण या कंपोजिशन मध्ये मी "गझल कहना" हे रूप अबाधित ठेवलंय आणि चाल बांधली आहे. सर्वांनी जरूर ऐका.

क्लिक करा... 




प्रवरा संदीप


1 comment: