आकाश झेप - भाग १: 'राइट बंधू' पूर्व काळ

 ज्या मानवाने आकाशात पक्ष्यासारखे उडण्याचे स्वप्न सर्वप्रथम पाहिले, आज संपूर्ण विश्व त्याचे ऋणी आहे.

रामायणामध्ये 'पुष्पक' विमानाचा, तसेच ऋग्वेदामध्ये प्रत्यक्ष विमानाचा नाही, परंतु 'यांत्रिक पक्षी' असा उल्लेख आढळतो. जैन धर्म साहित्यामध्ये 'पुष्प-उत्तर, अपराजित, जयंत, विजय' अशा विमानांचा उल्लेख आला आहे.

हजारो वर्षांपूर्वी महर्षी भरद्वाज यांनी 'यंत्र सर्वस्व' नावाचा ग्रंथ लिहिला. ज्यामध्ये सर्व प्रकारचे यंत्र, तसेच त्यांच्या संचालनाचे विस्तृत वर्णन केले. त्याचाच एक भाग 'वैमानिक शास्त्र' आहे. या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात प्राचीन विषयांच्या पंचवीस ग्रंथांची सूची आहे. ज्यामध्ये प्रमुखतः आहेत: अगस्त्यकृत - शक्ती सूत्र, ईश्वरकृत - सौदामिनीकला, भरद्वाजकृत - अशुबोधिनी, यंत्रसर्वस्व तसेच आकाशशास्त्र, शाकटायनकृत - वायुतत्व प्रकरण, नारदकृत - वैश्वानरतंत्र, धूमप्रकरण इत्यादी.

चित्र: महर्षी भारद्वाज विमान

आंतरराष्ट्रीय संस्कृत शोध मंडळाने प्राचीन पांडुलिपींच्या शोधाचा विशेष प्रयत्न केला. त्याच्या आधारावर महर्षी भारद्वाज यांचे 'विमान प्रकरण' विमानशास्त्र प्रकाशात आले. या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केल्यावर आठ प्रकारच्या विमानांचा प्रत्यय आला

. शक्त्युग्दम - विजेवर चालणारे

. भूतवाह - अग्नी, जल, वायू यांवर चालणारे

. धूमयान - गॅसवर चालणारे

. शिखोगदम - तेलावर चालणारे

. अंशुवाह - सूर्यकिरणावर चालणारे

. तारामुख - चुंबक चालणारे

. मणिवाह - चंद्रकांत, सूर्यकांत मणींद्वारे चालणारे

. मरुत्सखा - केवळ वायूवर चालणारे

 सन १८८५ साली शिवकर बापूजी तळपदे (मुंबई) हे पहिले भारतीय ज्यांनी पहिले मानवरहित विमान तयार केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी संस्कृत साहित्य, वेद, महर्षी भारद्वाज यांच्या ग्रंथांचा अभ्यास करून 'मरुत्सखा' हे विमान तयार केले. त्या विषयावर २०१५ साली 'हवाईजादा' हा हिंदी चित्रपटही आला आहे.


चित्र: शिवकर बापूजी तळपदे

परदेशात, लिओनार्दो दि व्हिन्सी (इटली) यांनी १४८५ साली मानवसहीत ऑर्निथोपटर (पक्षाप्रमाणे पंख हलवणारे यान) - यानाची विस्तृत मांडणी केलेला उल्लेख आढळतो

२१ नोव्हेंबर १७८३ ला - अनोबे - फ्रांस येथील  रोझीयर आणि मार्क्विस या बंधूंनी 'मॉन्टगोलफियरया
गरम हवेच्या फुग्यातून, जगातील पहिले मानवासहितचे उड्डाण केलेते दोघे 'जगातील पहिले वैमानिक' म्हणून पॅरिस शहरावरून उडत होते. आपण अनेक शतके आपल्या मनाशी बाळगलेली उड्डाणाची महत्त्वाकांक्षा या प्रथम उड्डाणाने प्रत्यक्षात आली. आपले स्वप्न साकार झाले, अशी जाणीव त्यावेळी मानव जातीला झाली. परंतु ते वाऱ्याच्या मदतीवरच अवलंबून होते. वाफेवर चालणाऱ्या पंख्यांच्या मदतीने यान नियंत्रित करता येणे शक्य आहे काय, किंवा हवेपेक्षा हलक्या असणाऱ्या फुग्यांऐवजी हवेपेक्षा जड असणारी यंत्रे हवेत उडवत येतील काय, यांचे उड्डाण आपण नियंत्रित करू शकू काय अशा कल्पनांचे क्रांतिकारी विचार एकोणिसाव्या शतकभरात रशिया, फ्रान्स, जर्मनी अशा अनेक देशातही उड्डाणोत्साही लोक गांभीर्याने करत होते.

१८०४ साली ब्रिटिश संशोधक सर जॉन केली - यांनी पहिले ग्लायडर बांधले. हवेपेक्षा जड, उडणारे असे ते जगातील पहिले यान होतेलोकांना घेऊन जाऊ शकतील आणि शत्रूला मारूही शकतील एवढी मोट्ठी ग्लायडर्स त्या काळात तयार होऊ लागली होती.
 

१८४२ साली ब्रिटन मध्ये विल्यम सॅम्युअल हेन्सन यांनी त्यांच्या वाफेवरील यानाचा आराखडा तयार करून त्यावर हक्क मिळवला. १८४८ साली ब्रिटनमध्ये जॉन स्ट्रिंगफेलो यांचे 'नमुना विमान' बाहेर आणि इमारतीच्या आतही यशस्वीपणे उडाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अल्बटो संटोस डूमॉन्ट या ब्राझिलियन संशोधकाचे फ्रांस मधील मानवसहीत उडणाऱ्या फुग्यांचे संशोधन आढळते

शिवाय,त्या काळात आकाशात उडणाऱ्या कागदी पतंगांचे लहान मुलांना फार आकर्षण होते. तसेच मुलांमधील प्रिय असे 'उडणारे चिनी भोवरे' म्हणजे आधुनिक हेलिकॉप्टरचा छोटा नमुना होता.

संदर्भ:

1. पुस्तक: 'राइट बंधू' (लेखिका: आना स्प्राउल, रूपांतर: मीना वैशंपायन)

2.Google, Wikipedia pages: Vimana, Maharshi Bhardwaj, Shivkar Bapuji Talpade, Alberto Santos Dumont


लेखक: राकेश शांतीलाल शेटे
संपर्क: ८९५१६५५३६७

(विमानशास्त्र अभियंता, बेंगलोर)




16 comments:

  1. माहीतीपूर्ण लेख

    ReplyDelete
  2. Rakesh....Nice & informative...I wish I could write like you.

    ReplyDelete
  3. अभिजित शिंदेOctober 5, 2020 at 10:35 AM

    खूप छान लेख..

    ReplyDelete
  4. It is very important knowledge and also information for those who are much away from the fields like aeroplane's and helicopters and space shuttle.I congratulate you for this innovative article.

    ReplyDelete
  5. सुंदर माहिती मिळाली.. आमच्याकडुन शुभेच्छा..

    ReplyDelete
  6. फार सुंदर लेख. वाचुन खुप छान वाटत आहे.

    ReplyDelete
  7. खुप छान सुंदर माहिती दिली

    ReplyDelete