‘पाण्यात मारलेला प्रत्येक दगड बाऊन्स होत नाही.’, दादा मला चिडवत म्हणाला.
आज दादा मला भेटायला आय. आय. टी.
कॅम्पसला आला होता. मी इथे बी. टेक.ला आल्यापासून तो दोन वर्षांतून पहिल्यांदाच आला होता. आज आम्ही पवई लेकला फिरायला आलो होतो. लेक पाहून त्याला लहानपणचा पाण्यावर दगड फेकून बाऊन्स करायचा खेळ आठवला. ज्याचे जेवढे बाऊन्स त्याचे तेवढे पॉईंट्स.
काय मजा यायची. आज मात्र खेळात लक्ष नव्हतं माझं. दादाशी तो विषय काढायचा होता. कसा हे कळत नव्हतं. पण दादाने काहीशी सुरुवात करून दिली होती.
‘दादा, पण खूप फोर्सने फेकला तर?’ मी विचारलं.
‘नाही रे. विसरलास?
दगड चपटा पाहिजे. जाड आकाराचा दगड कितीही फोर्सने फेकलास तरी तो बुडणारच.
शेवटी त्याच्या मूळ आकारावर हे अवलंबून असतं. Force doesn't matter.’
‘मग दादा, using same logic, मुळात technical विषयांची आवड नसलेल्याला केवळ तो हुशार म्हणून जबरदस्ती करुन आय.आय.टी. ला पाठवलं तरी शेवटी तिथे तो बुडणारच... माझ्यासारखा.’
दहावीनंतर घरात झालेलं मोठ्ठं भांडण आम्हा दोघांनाही आठवलं. मला आर्ट्समधे अतिशय इंटरेस्ट होता. पण बाबा आणि दादा दोघांनी ब्रेनवॉश करून सायन्सला ऍडमिशन घ्यायला लावली. पुढे जबरदस्तीने जे. इ. इ.
कोचिंगला घातलं.
पण मुळात ह्या लाईनची गोडी नसल्याने आता त्याचे परिणाम दिसत होते. दोन्ही वर्षं माझा सी.पी.ए. सातच्या खाली होता (दहापैकी). Faculty advisor ने ‘पुढे नोकरी मिळायला त्रास होईल, work harder.’, असं सुद्धा सांगून झालं होतं. वर्गात मी खूप मागे पडलो होतो. आत्मविश्वास कमी झाला होता.
पण मुळात ह्या लाईनची गोडी नसल्याने आता त्याचे परिणाम दिसत होते. दोन्ही वर्षं माझा सी.पी.ए. सातच्या खाली होता (दहापैकी). Faculty advisor ने ‘पुढे नोकरी मिळायला त्रास होईल, work harder.’, असं सुद्धा सांगून झालं होतं. वर्गात मी खूप मागे पडलो होतो. आत्मविश्वास कमी झाला होता.
दादाला तेव्हा का नाही लक्षात आलं? - चुकीच्या आकाराचा दगड कितीही जोरात पाण्यावर फेकला तरी तो बाऊन्स होणार नाही. तो बुडणारच.
Force
doesn't always work.
मानस
Very nice Manas,
ReplyDeleteKeep writing !!
सुंदर
ReplyDelete