चकुल्या

"चकुल्या"! होअसंच म्हणायची ती. गोरी गोरी पानफुलासारखी छान! अगदी तशीच होती ती.  लहान वयात लग्न होऊन शेजाऱ्यांच्या घरात  आली आणि तिच्या हसतमुख,मनमिळावू स्वभावाने आमच्या अख्ख्या कॉलनीचीच ती लाडकी वहिनी बनून गेली. तिचं ते खळखळून हसणंआल्या गेल्या पै-पाहुण्यांचं अगत्याने स्वागत करणंत्यांचा पाहुणचार करणं. हौशी होती ती फार. संकटांनाही अगदी हसतमुखानं सामोरी जाणारी ती. अजूनही डोळ्यांसमोर तिची जशीच्या तशी प्रसन्न करणारी मूर्ती उभी राहते.

खाण्याची आणि खिलवण्याची भारी हौस होती तिला.आम्ही माहेरवाशिणींनी माहेरी पाउल ठेवले की धावत येऊन हसऱ्या चेहऱ्याने पहिल्यांदा स्वागताला हजरअसायची. "आलीस का ग बाय," म्हणून मायेची विचारपूस असायची तिची. गाठभेट घेऊन झाली की घरी जाऊन जेवणाच्या वेळेआधी गरम गरम पदार्थांनी भरलेलं ताट आणून द्यायची. "चलाखावा गरम गरम,",असा सोबत प्रेमळ आग्रहही असायचा. आम्हीही आनंदाने मग गप्पांच्या मैफिलीत त्या पदार्थांवर तुटून पडायचो. वडेशिराभजीब्रेडरोल्स असा साग्रसंगीत असे त्या ताटाचा थाट. आमच्या पिल्लांना  सोबत घेऊन जाऊन त्यांच्याशी गप्पागोष्टी  करतघरातली मांजरीकुत्र्यांची पिल्लं दाखवतत्यांना खेळवत,त्यांच्या आवडीचा खाऊही बनवून प्रेमाने खायला घालत असे.

दर सोमवारचा उपवासाचा दिवस. संध्याकाळचा चाकोल्यांचा बेत असायचा. सोमवार म्हंटलं की चकोल्या असं गणित ठरलेलंच असायचं. आम्हाला सगळ्यांना तिच्या हातच्या चकोल्या फार आवडायच्या. माहीत होतं तिला. मग सकाळीच येऊन सांगून जायची, "संध्याकाळी चकुल्या देतीया. बाकी काय करू नका." त्या दिवशी संध्याकाळची वाट बघण्यातच मग आमचा दिवस सरायचा. पातेलं भरून गरमागरम चकोल्या रात्रीच्या जेवणापर्यंत हजर असायच्या. घरभर त्या चकोल्यांचा वास असा काही दरवळायचा की आमच्या पोटातले कावळे काही धीर धरायचे नाहीत. मग आम्ही सगळे त्या चकोल्यांवर मनसोक्त ताव मारायचो. तृप्त व्हायचो. माहेरपणाला आल्यावर मिळणाऱ्या तिच्या ह्या प्रेमाने आणि आपुलकीने मन भरून यायचं.

दर सोमवारी नित्यनेमाने चकोल्या करणारी आमची लाडकीसुगरणअन्नपूर्णा वहिनी आता साक्षात शिवपार्वतीलाच तिच्या हातच्या "चकुल्या" करून खायला घालायला गेलीय.हसत हसतच. तृप्त झाले असतील तिकडे शिवपार्वतीही!

"चकुल्या"

साहित्य- कांदा - १खोबऱ्याचा तुकडा
दहा पोळ्यांची मळलेली कणिक,
पुदिना- १० ते १२ पानं कोथिंबीर मूठभरकढीपत्ता- ८ ते १० पानं,
कांदालसूण मसाला २ चमचे,
लाल तिखट १ चमचा,
तुरीच्या डाळीचं वरण वाटीभर,
मीठपाणीफोडणीसाठी तेल २ ते ३ चमचेजीरेमोहरीहिंगहळद.

कृती-- कांदा साल काढूनआणि खोबरं विस्तवावर भाजून घेऊन खोबर्यावर थोडे जिरे भुरभुरावेत. भाजलेला कांदाखोबरंजीरेकोथिंबीरपुदिनाकढीपत्ताकांदालसूण मसालामीठ सर्व जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्या. कढईत तेल तापवूनजीरेमोहरीहिंगहळदघालून नेहमीप्रमाणे फोडणी करा. त्यात वरील वाटण घालून किंचित परतवून हवे तेवढे पाणीचवीप्रमाणे मीठ घाला. उकळी येऊ द्या. कणकेची पातळ पोळी लाटून त्याच्या चकत्या पाडून त्या उकळणाऱ्या पाण्यात सोडा. शिजत आल्यावर वरण घाला. एकदोन उकळ्या आल्या की गॅस बंद करा. गरम गरम 'चकुल्या'वर तूप घालून सर्व्ह करा.

श्वेता मोघे -साठये


2 comments: