का सुटावे धैर्य माझे, प्रश्न मजला का पडावा ?
माझिया चित्तास का या दुर्गुणांचा भार व्हावा ?
तप्त व्हावे, गळुन जावे,
विरघळावे, हे खरे मग
मूस कुठलीही असो, का फरक सोन्याला पडावा?
वाढणे अन डवरणे हा मूळ हेतू मान्य तर मग
कोण खाली बैसतो का प्रश्न वृक्षाला पडावा?
निर्झराने कोसळावे प्राक्तनाचा खेळ त्याच्या
मग तुषारांच्या क्रिडेला का उगा आक्षेप घ्यावा?
उजळती वस्तू जिथे ते श्रेय किरणांचे म्हणावे
सावली पडते तिथे हा दोष कोणाचा धरावा?
केंद्र माझे, व्यास माझा,
परिघ माझा आखलेला
का उगा कक्षेस माझ्या ताणण्याचा दंभ व्हावा?
दगड आहे मान्य केले की उरे आशा कशाची
मूर्तिकाराची वळो दृष्टी असा का मोह व्हावा?
मीच कर्तृत्वास माझ्या का फुका सन्मान द्यावा?
राजेंद्र
वैशंपायन
खूप आवडली कविता.
ReplyDelete